शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

मागितले २५० कोटी, पण मिळाले सहाच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 12:41 AM

कोरोनासाठी मदत : ‘आत्मनिर्भर’ ठामपा

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे  :  मागील एक वर्षाहून अधिक काळात कोरोनाचा मुकाबला करण्याकरिता महापालिकेने ७७ कोटी रुपये खर्च केले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्याकरिता महापालिकेने ३०० कोटी रुपयांची तरतूद करुन, राज्याकडे २५० कोटींची मागणी महानगरपालिकेने केली होती. प्रत्यक्षात त्यापैकी अवघे सहा कोटी उपलब्ध झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ठाणे शहराकडे महाविकास आघाडीतील दोन मंत्रिपदे असताना ठाण्याची कोरोना निधीबाबत चांगलीच उपेक्षा झाली आहे.

ठाणे  महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वर्ष उलटूनही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे पालिकेच्या उत्पन्नावर  परिणाम झाला आहे. मालमत्ता आणि पाणीपुरवठा विभाग वगळल्यास इतर कोणत्याही विभागाकडून पालिकेला अद्याप अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी यंदा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गतवर्षी जे उत्पन्न मिळाले त्यातील मोठा हिस्सा कोरोनासाठी खर्च केला जात आहे. मागील वर्षभरापासून आतापर्यंत कोरोनाच्या मुकाबल्याकरिता ७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये पीपई कीट, सॅनिटायझर, औषधे, कंत्राटी डॉक्टर, आया, वॉर्डबाय, सफाई कामगार, ऑक्सिमीटर, जेवणखाण, बेड आदी खर्चाचा समावेश आहे. तसेच ज्युपिटर येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयासाठी २५ कोटींचा खर्च करण्यात आला. एमएमआरडीएकडून त्यासाठीचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. 

 दरम्यान, मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने त्यासाठी तरतूद केलेला निधी इतर कामांसाठी वर्ग करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. अत्यावश्यक कामांसाठी हा निधी वळविण्यात येणार होता. परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने निधी वळवला नाही. कोरोनासाठी ३०० कोटींचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून वेळप्रसंगी कोरोनाचे रुग्ण वाढले तरी त्याचा सामना करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.

दोन मंत्र्यांचा फायदा काय?कोरोना मुकाबल्याकरिता २५० कोटींची मदत द्यावी यासाठी महापौरांसह इतर लोकप्रतिनिधी आणि भाजपच्या मंडळींनीदेखील पत्रव्यवहार केला. परंतु मंत्रिमंडळात ठाण्याचे दोन मंत्री असतानाही सरकारने आतापर्यंत केवळ सहा कोटींची मदत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका