उल्हासनगर : शहरातील रस्त्याच्या बांधणीत सिमेंट व डांबरचा योग्य प्रमाणात वापर होण्यासाठी काँग्रेसकडून डांबर व सिमेंटचे दान महापालिकेला देण्यात आले. शहरातील रस्ता बांधणीत सिमेंट व डांबरचे प्रमाण कमी असल्याने रस्ते खड्डेमय झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला आहे. उल्हासनगरातील सिमेंट व डांबर रस्त्याच्या बांधणीत योग्य प्रमाणात सिमेंट व डांबरचा वापर होत नसल्याने, बहुतांश रस्ते खड्डेमय झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. सिमेंट रस्त्यात सिमेंट व डांबर रस्त्यात डांबर योग्य प्रमाणात वापरण्यासाठी काँग्रेस पेक्षाने मंगळवारी डांबर व सिमेंटचे दान महापालिकेला केले. तसेच अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना निवेदन देऊन आतातरी रस्ते बांधणी चांगली होईल. अशी आशा साळवे यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या डांबर व सिमेंट दानच्या आंदोलनाला माजी आमदार पप्पु कलानी, शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समनव्यक धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, शहरप्रमुख कैलास तेजी, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मनोज लासी यांनीही उपस्थित राहून समर्थन दिले.
महापालिका कोट्यवधी रुपये रस्ता दुरुस्तीवर खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था झाल्याने, वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवात गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन खड्ड्यातून करण्याची वेळ बाप्पांच्या भक्तावर आली होती.आता दिवाळी-दसरा हे मोठे सणापूर्वी महापालिकेने दर्जेदार रस्त्यांची बांधणी करावी. अशी अपेक्षा आंदोलनातील नेत्यांनी व्यक्त केली. महापालिका अधिकाऱ्यांचा वचक ठेकेदारावर न राहिल्याने, रस्त्याची बांधणी निकृष्ट होत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी केला. आंदोलनाला काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे, पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, शहरप्रमुख कैलास तेजी, राष्ट्रवादीकडून माजी आमदार पप्पू कालानी, माजी नगरसेवक मनोज लासी, राष्ट्रीय सफाई कामगार नेते राधाचरण करोतीया, काँग्रेसचे पदाधिकारी किशोर धडके, विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.