------
कोरोनाचे नवे ५७ रुग्ण
कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे नवीन ५७ रुग्ण आढळून आले आहेत. तर, ३८ रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ५११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मनपा हद्दीत एक लाख ३७ हजार ३३० इतके रुग्ण बरे झाले आहेत.
----------------------
आज लसीकरण नाही
कल्याण : सरकारकडून लसीचा साठा उपलब्ध होऊ न शकल्याने गुरुवारी केडीएमसी हद्दीत मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोविड लसीकरणाची सुविधा बंद राहील, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.
-----------------------
मोबाइल लंपास
डोंबिवली : रामकुमार सिंह हे एमआयडीसी फेज २ मधून कामावरून घरी जात असताना त्यांच्या खिशातील मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी खेचून पलायन केले. ही घटना रविवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------
दुचाकी चोरी
डोंबिवली : फैयाज खान यांनी त्यांची दुचाकी गोविंदवाडी परिसरात उभी केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांत तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
----------------