शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

ठाणे महापालिकेच्या डीजी अ‍ॅपद्वारे मालमत्ता कर भरल्यास मिळणार मालमत्ता कराच्या सामान्य करात दोन टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 5:06 PM

ठाणे महापालिकेच्या डीजीसीटी कार्डच्या माध्यमातून मालमत्ता कर भरणाऱ्या  मालमत्ताधारकांना मालमत्ताकाच्या सामान्य करात २ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे.

ठळक मुद्देआजी माजी सैनिकांनाही मिळणार मालमत्ता करात सवलतपर्यावरण,वृक्षारोपणात सक्रीय सहभाग घेणाऱ्यांनाही मिळणार सवलत

ठाणे - ठाणे महापालिकेच्या देशातील पहिल्या डीजीसीटी अ‍ॅपचा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुभारंभ झाला. परंतु या अ‍ॅप बाबत अपेक्षित अशी जनजागृती न केल्यानेच आता पर्यंत केवळ ६२०० नागरीकांनीच हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. त्यामुळेच आता हे अ‍ॅप ठाणेकरांनी डाऊनलोड करावे आणि या अ‍ॅपद्वारेच मालमत्ताकराचा भरणा करावा यासाठी ठाणे महापालिकेने मालमत्ता कराच्या सामान्य करात २ टक्के सवलत देण्याचा अजब फंडा तयार केला आहे. तसेच पर्यावरण, वृक्षारोपण यामध्ये सक्रीय सहभाग घेणाऱ्या गृहनिर्माण संस्था, सदनिकाधारकांना वैयक्तीक मालमत्ता करातील सामान्य करात दोन टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.                  ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देशातील पहिल्या डीजी अ‍ॅपचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी झाला. त्यानंतर आता पर्यंत हे अ‍ॅप २२ लाख ठाणेकरांपैकी केवळ ६ हजार २०० नागरीकांनी डाऊनलोड केले आहे. तसेच या अ‍ॅपच्या माध्यमातून पालिकेच्या मालमत्ता कर व इतर कर भरण्यासाठीची सुविधा सुरु होण्यास तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. परंतु, ठाणे महापालिका या अ‍ॅपच्या जनजागृतीमध्ये कमी पडल्याचे आजही दिसत आहे. तज्ञांच्या म्हणन्यानुसार सुरु झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत किमान ५० हजार नागरीकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करणे अपेक्षित होते. परंतु तसे काही झालेले नाही. त्यामुळेच आता ठाणे महापालिकेने यापूर्वी विविध योजना यशस्वी करण्यासाठी जो फंडा वापरला तोच फंडा आता देखील वापरण्याचा निर्णय घेतला आहे.                  यापूर्वी ठाणे महापालिकेने रेनवॉटर वॉटर हार्वेस्टींग कार्यप्रणाली ज्या सोसायटी वापरतील त्यांना मालमत्ता करात ५ टक्के सवलत, घनकचरा व्यवस्थापन योग्य रितीने केले असेल तर ३ ते ५ टक्के सवलत, ज्या सोसायची घनकचऱ्यावर प्रक्रिया करतील त्यांना ७.५ टक्के सवलत, त्याचाच आधार घेत आता ठाणे महापालिकेने डिजीकार्ड यशस्वी करण्यासाठी याच तंत्राचा आधार घेतला आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या डीजीसीटी प्लॅटफॉर्मद्वारे मालमत्ता कर भरणाऱ्या  मालमत्ताधारकास मालमत्ता कराच्या सामान्य करात २ टक्के सवलत, तसेच पर्यावरण, वृक्षारोपण यामध्ये सक्रीय सहभाग घेणाऱ्या  गृहनिर्माण संस्था, सदनिकाधारकांना वैयक्तीक मालमत्ताकरातील सामान्य करातही २ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.चौकट - आजी माजी सैनिक - आजी सैनिक पत्नी हे देखील ठाणे शहराचे नागरीक म्हणून ठाणे शहरास त्यांचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांना देखील मालमत्ता कराच्या सामान्य करात १०० टक्के सवलत, तसेच संरक्षण दलातील शौर्य पदकधारक व माजी सैनिकांच्या विधवा यांना देखील एका मालमत्तांच्या मालमत्ता करात १०० टक्के सवलत, तसेच महापालिकेच्या या सर्व धोरणानुसार एखाद्या गृहनिर्माण संकुलाने या प्रकल्पांची अंमलबजावणी केल्यास त्यांना मालमत्ता करात सुमारे ३२.५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाTaxकर