ठाणे: घोडबंदर रोडवरील दोन्ही मार्गिकांवर एकाच वेळी दोन कंटेनर उलटून दोन विचित्र अपघात झाल्याची घटना सोमवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास गायमुख गाव येथे घडली. यामध्ये दोन्ही कंटेनर चालकांसह क्लिनर, असे तिघे जखमी झाले. या अपघाताने घोडबंदर रोड जवळपास एक तासासाठी ठप्प झाला होता. ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि वाहतूक पाेलिसांनी दोन्ही कंटेनर एका बाजूला केले. त्याचबरोबर रस्त्यावर सांडलेल्या तेलावर माती पसरून रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
घोडबंदर रोडवरील गायमुख गाव येथे दोन कंटेनर चालकांचे वाहनावरील िनयंत्रण सुटल्याने दोन्ही कंटेनर उलटून रोड वरती ऑईल पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन िवभाग आिण कासारवडवली पो िलसांनी धाव घेतली. या अपघातामध्ये दिल्लीकडून नाव्हा शेवा कडे १० टन कपड्याचा माल घेऊन चाललेला कंटेनर चालक वकील खान हा किरकोळ जखमी झाला. तसेच ठाण्याकडून घोडबंदर रोडमार्गे नाव्हाशेवाकडे सुमारे २५ टन केमिकल ड्रम असलेला कंटेनर घेऊन चाललेला चालक धर्मेंद्र शुक्ला (३०) आणि िक्लनर अजय कुमार (४२) हे दोघे जखमी झाले आहेत.
या तिघांनाही तातडीने ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक सुमारे एकभर तास ठप्प झाली होती. घटनास्थळी दोन हायड्रा क्रेन यंत्रणेच्या साह्याने अपघातग्रस्त कंटेनर रोडच्या बाजूला केले. आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या साह्याने रोडवर पडलेल्या ऑईलवरती माती पसरवून घोडबंदर रोडकडून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या मार्गिका सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन िवभागाचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.