भार्इंदर - उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ वर्षापूर्वी आंब्याचे रोपटे लावले होते. ते आता बहरले असून या झाडाला त्यांचे नाव देण्यात आल्याने ते अटलजींच्या पश्चात कायम स्मरणात राहणार आहे.२००३ मध्ये प्रबोधिनीच्या लोकार्पण कार्यक्रमाला वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्यासह अनेक मंत्री व नेते उपस्थित होते. त्यावेळी प्रबोधिनीतील ‘तेजोनिधी’ प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीजवळ अटलजींच्या हस्ते आंब्याचे रोपटे लावले. पुढे ते रोपटे बहरून त्याला आंबे आल्याने त्यातील तीन डझन आंबे काही वर्षापूर्वी अटलजींना भेट म्हणून पाठवले होते. त्यांना ते खूपच आवडले होते. लोकार्पणावेळी प्रबोधिनीत झालेल्या मेजवानीत पुरणपोळीचा आस्वादही त्यांनी घेतला होता. त्यावेळी त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी खरच एक केशवाची ‘सृष्टी’ असल्याचे गौरवोद्गार काढले होते.दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९७७ आणि १९८४ मध्ये शहापूरला भेट दिली होती. ८४ मध्ये त्यांची शहापूरमध्ये सभा झाली होती. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
अटलजींनी लावलेल्या रोपट्याचा झाला वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 2:43 AM