जितेंद्र कालेकरठाणे : जेवणाचे पेमेंट ग्राहकाने एटीएमद्वारे केल्यानंतर ते एटीएम कार्ड स्वत:कडेच ठेवून २५ हजारांच्या रोकडसह मोबाईल आणि महागड्या बॅगेची खरेदी करून पसार झालेल्या श्रीप्रसाद देशमुख (२३) या वेटरला नौपाडा पोलिसांनी वाडेगाव (अकोला) येथून अटक केली आहे. त्याला ११ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.नौपाड्यातील ‘संजीवना’ या हॉटेलमध्ये २८ एप्रिल २०१८ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रामनाथ शानबाग (४५) यांनी जेवण केले. जेवणाच्या पेमेंटसाठी त्यांनी श्रीप्रसाद या वेटरकडे एटीएम कार्ड दिले. त्यावेळी एटीएमचा परवलीचा (पासवर्ड) क्रमांक टाईप करतांना श्रीप्रसादने लक्षपूर्वक पाहिले होते. रामनाथ हे धावपळीतच मित्रांबरोबर गप्पा मारत बाहेर पडले. त्यावेळी एटीएम कार्ड त्यांना परत करण्याऐवजी श्रीप्रसादने ते स्वत:कडे ठेवले. त्यानंतर दुसºयाच दिवशी १२ हजार ५०० चा मोबाईल, साडेचार हजारांची नामांकित कंपनीची बॅग त्याने खरेदी केली. त्यानंतर २५ हजारांची रोकडही काढली. रोकडसह ४२ हजारांचा ऐवज त्याने फसवणुकीने लुबाडून हॉटेलमधूनही पलायन केले. याप्रकरणी रामनाथ यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात २९ एप्रिल रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कावळे आणि हवालदार गोरक्षनाथ राठोड यांच्या पथकाने वाडेगाव येथील त्याच्या घरातून ६ मे रोजी त्याला ताब्यात घेतले. ७ मे रोजी त्याला अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली...........................मोबाईल खरेदीनेच लागला सुगावा...एटीएम फसवणुकीने ताब्यात घेतल्यानंतर श्रीप्रसाद या वेटरने नव्या कोºया मोबाईलची खरेदी केली. उपनिरीक्षक कावळे यांच्या पथकाने याच मोबाईलच्या इएमआयच्या आधारे त्याचे ‘लोकेशन’ शोधले. तेंव्हा तो पुण्यात असल्याचे उघड झाले. पोलीस पुण्यात पोहचले तोपर्यंत तो तिथून पसार झाला होता. त्यानंतर त्याच्या मित्रांकडे केलेल्या चौकशीत आणि तांत्रिक तपासणीत तो वाडेगावला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तिथून ताब्यात घेतले..........................
एटीएम कार्डद्वारे फसवणूक करणाऱ्या वेटरला अकोल्यातून अटक : ठाणे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 9:48 PM
हॉटेलमध्ये ग्राहकाने पेमेंट केल्यानंतर त्याच्याच एटीएम कार्डच्या आधारे ग्राहकाची फसवणूक करणा-या वेटरला थेट अकोल्यातून ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी अटक केली.
ठळक मुद्देपेमेंटनंतर वेटरने स्वत:कडेच ठेवले एटीएम कार्डग्राहकाच्या परस्पर केली खरेदीमोबाईलच्या खरेदीनेच लागला सुगावा