ठाणे : पाकिस्तानकडून वारंवार अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. परंतु, त्यांना जर चोख प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर त्यासाठी महाराष्टÑाच्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटण दाबावे, असे आवाहन करताना तसे केले तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात पडेल, असे विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केले आहे. तसेच हाच अणुबॉम्ब कलम ३७० ला विरोध करणाऱ्यांवरही पडेल, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.ठाणे येथील मानपाडा भागातील टिळक बँक्वेट येथे शनिवारी दुपारी भाजपशी निगडित उत्तर भारतीय संघटनेकडून स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. तसेच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर हे सुद्धा कार्यक्र माला उपस्थित होते.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इतके मतदान करा की, मतदानयंत्रे ओव्हरफ्लो झाली पाहिजेत, असेही विधान त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गेल्या ७० वर्षांपासून देशाला कीड लागली होती. ती दूर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कलम ३७० ही त्यापैकी एक कीड होती, असे त्यांनी सांगितले. लक्ष्मी ही कमळातून येते, घड्याळातून नाही. घड्याळ बंद पडले असल्याची टीकाही त्यांनी राष्टÑवादीवर केली.भाजपलाच यशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
कलम ३७० ला विरोध करणाऱ्यांवर अणुबॉम्ब पडेल - केशवप्रसाद मौर्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 1:47 AM