ठाणे : एका महिलेस प्रेमपाशात अडकवून तिच्या तीन मुलामुलींवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमास ठाणे न्यायालयाने बुधवारी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पीडित भावंडांची आईदेखील या प्रकरणात आरोपी होती. तिच्यासह अन्य एका आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
आॅगस्ट २०१४ मध्ये कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मफतलाल कंपनी मैदानाजवळ असलेल्या झोपडपट्टीत ही घटना घडली होती. या वस्तीतील एका महिलेस १९ आणि साडेतीन वर्षांच्या दोन मुली आणि पाच वर्षांचा एक मुलगा होता. तिचा पती तिच्यासोबत राहत नव्हता. ठाण्यातील लोकमान्यनगरचा रहिवासी महेंद्र ब्रिजलाल कोरी (३५) याच्याशी तिचे अनैतिक संबंध होते. संधी मिळाली की, तो पीडित मुलीवर अत्याचार करत होता. एवढेच नव्हे तर लहान मुलगा आणि मुलीशीही त्याने अनैसर्गिक अत्याचार केला. कळवा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एम.सी. कारकर यांनी महेंद्र कोरी याला २ आॅगस्ट २०१४ रोजी अटक केली. या प्रकरणामध्ये पीडित मुलीची आई आणि संतू पाल माता पाल नामक एक वयस्करही आरोपी होता. तो महेंद्र कोरी याच्या परिचयाचा होता. त्यानेही आपल्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित मुलीने केला. पोलिसांनी याप्रकरणी पीडित मुलीची आई आणि संतू पाल दोघांनाही अटक केली होती.१0 वर्षे सक्तमजुरीच्पोलीस निरीक्षक एम.सी. कारकर आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक डी.के. ताजणे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.च्या प्रकरणाचा खटला ठाणे न्यायालयाचे विशेष आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. गोंधळेकर यांच्यासमोर चालला. न्यायालयाने महेंद्र कोरी याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पीडित मुलांची आई आणि संतू पाल यांची निर्दोष मुक्तता केली.