शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:34 AM

लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीवर तिचाच नातलग असलेल्या दीपक विश्वकर्मा (२८) याने पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीवर तिचाच नातलग असलेल्या दीपक विश्वकर्मा (२८) याने पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.पीडित तरुणी आणि दीपक हे दोघेही नातेवाईक असल्यामुळे त्यांची एकमेकांशी चांगली ओळख आहे. याच ओळखीतून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. तोही उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील सोहनी गावचा रहिवासी आहे. याच कारणामुळे त्यांची अधिक जवळीक झाली. याचा गैरफायदा घेत त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर २०१२ पासून नवी मुंबईतील दिघा येथील ईश्वरनगर, दिवा येथील त्याच्या घरी तसेच लोकमान्यनगर येथील तिच्या घरी आणि मुलुंड येथील एका लॉजवर अत्याचार केला. लग्नाचे नाव काढल्यानंतर तो वेगवेगळी कारणे सांगून लवकरच ते करणार असल्याचे तिला सांगायचा. पुढे शरीरसंबंध ठेवण्यासाठी तो धमकावत होता. कुठे वाच्यता केल्यास बदनामी करण्याचीही तिला तो धमकी देत होता. तरीही, तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र तो ठाणे जिल्ह्यातून पसार झाला. अखेर, आपली मानसिक आणि शारीरिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने ५ डिसेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दीपकविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. आरोपी ठाण्यातून पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा