ठाणे: जानेवारीत मुंब्रा आणि औरंगाबादमधून अटक करण्यात आलेल्या १० जणांविरोधात एटीएसनं आरोपपत्र दाखल केलं आहे. या १० जणांचा संबंध दाईश या दहशतवादी संघटनेशी आणि वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईकशी असल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. मुंब्र्यातील मुंब्रेश्वर मंदिरातील प्रसादात विष कालवून हजारो भाविकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली अटकेत असलेल्या १० पैकी एका आरोपीनं दिली आहे. यातील काही जण मुंब्र्याचे, तर काही जण औरंगाबादचे रहिवासी आहेत. मुंब्र्यात मोठा घातपात घडवण्याचा डाव एटीएसनं उधळला होता. त्यावेळी आयसिसच्या १० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या घातपाताची संपूर्ण योजना समोर आली आहे. एटीएसनं पकडलेल्या दहशतवाद्यांनी मुंब्रेश्वर मंदिराची रेकी केली होती. भंडाऱ्यातील जेवणात विष मिसळून हजारो भाविकांना संपवण्याचा त्यांचा कट होता. एटीएसनं न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आलेली आहे.
'त्या' १० जणांना प्रसादात प्रसादात विष कालवून भाविकांचा जीव घ्यायचा होता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 10:17 PM