सोशल मिडियावर पोस्ट करणाऱ्या कॉंग्रेसच्या प्रवक्त्याला चोप

By अजित मांडके | Published: March 30, 2023 04:17 PM2023-03-30T16:17:06+5:302023-03-30T16:17:49+5:30

ठाण्यात गुरुवारी या संदर्भात कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

Attack on Congress spokesperson for posting on social media in thane | सोशल मिडियावर पोस्ट करणाऱ्या कॉंग्रेसच्या प्रवक्त्याला चोप

सोशल मिडियावर पोस्ट करणाऱ्या कॉंग्रेसच्या प्रवक्त्याला चोप

googlenewsNext

ठाणे : चैत्र नवरात्र उत्सव झाला राजकीय आखाडा अशा आशयाचा मेसेज सोशल मिडियावर टाकणाºया गिरीश कोळी यांना काही अज्ञातांना चोप दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या विरोधात कॉंग्रेसने आवाज उठविला असून केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दाखविण्यासाठी मारहाण करण्यात आल्याचा दावा कोळी यांनी केला आहे. तर ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई केली जावी, त्यातील एक पदाधिकारी हा शिवसेनेचा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणीही त्यांनी केली.

ठाण्यात गुरुवारी या संदर्भात कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशचे पदाधिकारी मनोज शिंदे, प्रवक्ते सचिन शिंदे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बुधवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास कोपरीत काही अज्ञातांना कोळी यांना अडवून साहेबांच्या विरोधात पोस्ट कशाला टाकतो, त्यांना बदमान का करतो, असे सांगत पोस्ट डीलीट करण्यास सांगितले. तसेच दोघांना त्यांना मारहाण देखील केली. त्यानंतर भितीपोटी कोळी यांनी ती पोस्ट डिलीट केली. त्यानंतर याविरोधात कॉंग्रेसने संबधींताना तत्काळ अटक करुन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

तर हा एक भ्याड हल्ला असून ज्याने मारहाण केली तो गुंड प्रवृत्तीचा असल्याचा आरोप मनोज शिंदे यांनी केला. केवळ आपले महत्व वाढविण्यासाठी त्यांनी हा भ्याड हल्ला केला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर पुढील २४ तासात संबधींताना अटक करुन कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी शिंदे यांनी केली. परंतु कारवाई न झाल्यास मारहाण करणाºयाच्या घराबाहेर आंदोलन केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ दहशतीचा हा भाग असून लोकशाही चेपण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी नमुद केले. कोळी यांनी कोणाच्याही भावना दुखतील अशा स्वरुपाचे मत सोशल मिडियावर व्यक्त केले नव्हते. तर या मारहाणीचा व्हिडीओ देखील आता सोशल मिडियावर वायरल झाला आहे.

Web Title: Attack on Congress spokesperson for posting on social media in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.