ठाणे: ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. विरोधी पक्षातील नेत्याचा जीवजर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे, असा हल्लाबाेल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सद्वारे केली आहे. शनिवारी ठाण्यात सभेपूर्वी शिवसनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर मनसेच्या ३० ते ३५ जणांनी हल्ला केला. याच हल्ल्याच्या पाश्र्वभूममीवर आव्डाड यांनी सतधधाऱ्यांवर हा हल्लाबाेल केला आहे.
आमदार आव्हाड यांनी साेशल मिडीयाद्वारे एक्सवर व्यक्त केलेल्या आपल्या टीकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतांना त्यांच्या वाहनावर जवळून काहीतरी फेणणारा एक आंदाेलक स्पष्ट दिसत असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी पाेस्ट केला आहे. त्यासाेबतच त्यांनी म्हटले आहे की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, आपला अधिकारीच इतका झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे संपूर्ण जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीव जर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार, सभा उधळून लावण्याची धमकी देणार, माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त इतकेच लक्षात ठेवा, की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही, असा इशाराही आव्हाड यांनी ठाकरे यांच्या वाहनावर मनसैनिकांनी शनिवारी केलेल्या हल्ल्या बाबत दिला आहे.