आॅनलाइन लोकमतठाणे, दि.05 - रामचंद्रनगर, वैतीवाडी भागातील फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण करणारा बाळू उतेकर या चौथ्या हल्लेखोरोलाही वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. यातील चारही आरोपींना ८ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.मंगळवारी सायंकाळी ठाणे महापालिकेच्या लोकमान्यनगर प्रभाग समितीचे वरीष्ठ लिपीक नयन राठोड यांच्यासह रुपेश पांडे, हाफीज शेख आणि बाळा उतेकर या चौघांना चंद्रिका तिवारी, संतोष तिवारी, संदीप तिवारी आणि उतेकर या चौघांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्यांच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला. त्यांना जिल्हा शासकीय रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना बुधवारी घरी सोडण्यात आले. पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांच्या पथकाने यातील चंद्रिका तिवारी, संतोष तिवारी आणि संदीप तिवारी यांना मंगळवारी सायंकाळी अटक केली. तर त्यांचा चौथा साथीदार उतेकर याला बुधवारी सकाळी अटक केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी दिली.मंगळवारी सायंकाळी अतिक्रमण विरोधी पथकातील नयन राठोड हे आपल्या काही कर्मचाऱ्यांसह रामचंद्रनगर येथील अनधिकृत फलकांवर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी तिथे रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना त्यांनी बाजूला होण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तिथून जाण्याऐवजी या पथकाशी हुज्जत घातली. यातून झालेल्या वादावादीतून त्यांनी या पथकावर हल्ला केला.
फेरीवाल्यांचा हल्ला: चौथ्या मारेकऱ्यालाही अटक
By admin | Published: July 05, 2017 8:12 PM