-----------------------------------------
कामगारांकडून टाइल्सचे बॉक्स लंपास
डोंबिवली : अनिल जैन यांची पूर्वेकडील खंबाळपाडा रोडवर रॉयल बाथ शॉपी कंपनी आहे. तेथील टाइल्सचे ४० बॉक्स चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास घडली. या चोरीप्रकरणी कंपनीतील कामगार निजाम शेख आणि इतरांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, जैन यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------------------------
रिक्षा चोरीला
डोंबिवली : उमेश टेंभे यांनी त्यांची रिक्षा ते काम करीत असलेल्या एमआयडीसीमधील अलकेमी लॅब्रॉटेरीज कंपनीच्या बाहेर बुधवारी उभी केली होती. तेथून रिक्षा चोरीला गेली. याप्रकरणी टेंभे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
-----------------------------------------------
चाकूने हल्ला
कल्याण : पूर्वेकडील खडेगोळवली येथे राहणारा करण मिश्र हा त्याच्या वडिलांना आणण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून टाटा पॉवर येथे जात होता. त्यावेळी अजहर नावाच्या व्यक्तीने त्याला दुचाकीवरून खाली पाडत विनाकारण शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. अन्य तिघांनी बांबूने करणला मारहाण केली. करणच्या तक्रारीवरून अजहर, अभि, दग्र्या, आकाश चौहान या चौघांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
------------------------------------------------------
दुचाकी चोरीला
कल्याण : सुभाष पाटील यांनी त्यांची दुचाकी पश्चिमेकडील संतोषीमाता रोड मॅक्सी ग्राउंड या ठिकाणी २० मे रोजी उभी केली होती. तेथून दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------------------------------
धारदार वस्तूने वार
कल्याण : अशोक सरोज हे बुधवारी रात्री साडेआठ वाजता गॅरेज बंद करून श्रीमलंग रोडने घरी जात होते. त्यावेळी बबलू गोसावी, सूर्यप्रकाश यादव आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी हमारे तरफ क्या देख रहे हो असे बोलत त्यांच्याकडे असलेल्या धारदार वस्तूने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------------------------