शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

जव्हार इथं एसटी कर्मचाऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 9:45 PM

ST Strike: बस आगारातील तरुण वाहक दीपक खोरगडे वय वर्षे 30 या बस कंडक्टर (वाहक) याने शनिवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

हुसेन मेमन

जव्हार –  गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची आग्रही मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दिवाळीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून अद्यापही संपावर तोडगा काढण्यात आला नाही. मात्र आतापर्यंत ३७ हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून संप मिटावा यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठका सुरु आहेत.

बस आगारातील तरुण वाहक दीपक खोरगडे वय वर्षे 30 या बस कंडक्टर (वाहक) याने शनिवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर जव्हार कुटीर रूग्णालयात उपचार सुरू आहे, दरम्यान प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली.

दरम्यान एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले असून सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोवर कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही असं सांगण्यात आलं आहे. त्यातच आहे त्या पगारात सुखी राहा असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले, हे ऐकताच मानसिक स्थिती बिघडल्याने आत्महत्याचा प्रयत्न केला, असे जबाब पीडित रुग्णाने जव्हार पोलिसांना दिला आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप