लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य गुप्तवार्ता विभागातील एका सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला अधिका-याचीच सोनसाखळी खेचून पळून जाण्याचा प्रयत्न ठाण्याच्या साकेत भागातील रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी घडला. हा प्रयत्न असल्यामुळे या महिला अधिका-याने याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.राबोडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहणा-या या महिला अधिकारी १२ जून रोजी सकाळी फेरफटका मारण्यासाठी साकेत रोड भागाततून जात होत्या. त्यावेळी एका मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांची सोनसाखळी जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. अचानक हा प्रकार घडला तरी त्यांनीही तेवढयाच निकराने हा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, सोनसाखळी खेचण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गळयाला जबरदस्त दुखापत झाली. हा प्रयत्न असल्यामुळे याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केलेली नाही. परंतू, याबाबतची माहिती मिळताच आरोपीही पकडले जातील, असा विश्वास राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मोबाईल गेल्याची माहिती मिळाल्यानंतर राबोडी पोलिसांनी त्याचा शोध घेतल्याचेही शिरतोडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याची सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न
By जितेंद्र कालेकर | Published: June 16, 2020 9:07 PM
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गेली अडीच महिने सुरु असलेला लॉकडाऊन आता काही प्रमाणात शिथिल केला आहे. याचाच गैरफायदा घेत सोनसाखळी चोरटयांनीही आता डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील साकेत भागात चक्क एका वरिष्ठ महिला पोलीस अधिका-याचीच सोनसाखळी खेचण्याचा प्रकार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देसाकेत परिसरातील रस्त्यावरील घटनागळयाला झाली गंभीर दुखापत