शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न- अमोल मिटकरी

By पंकज पाटील | Published: April 17, 2023 6:03 PM

हे सरकार फार दिवस टिकणार नसून तारीख आणि वेळ लिहून घ्या, या सरकारचा काउंटडाऊन सुरू झाला आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

बदलापूर : जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. सोबतच हे सरकार फार दिवस टिकणार नसून तारीख आणि वेळ लिहून घ्या, या सरकारचा काउंटडाऊन सुरू झाला आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.बदलापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा मान्य केला आहे. हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर अजित पवार यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत मिटकरी यांना विचारके असता ज्या अंजली दमानिया यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या याबाबत ट्विट करतात आणि त्याच्या बातम्या बनतात, असं म्हणत अजित दादा हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांची जबाबदारी त्यांना पूर्णपणे माहिती आहे. आत्ता ज्या काही घडामोडी टीव्हीवर दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये अजिबात तथ्य नाही.

हा दादांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. राज्यातले सध्याचे सरकार हे जास्त दिवस टिकणार नसल्याचाही दावा त्यांनी केला. आजची तारीख आणि वेळ लिहून घ्या, हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही आणि राज्यात लवकरच एक नवीन महाविकास आघाडीचेसरकार येईल, असं अमोल मिटकरी म्हणाले. राज्यात शेतकरी अडचणीत असून अकोला जिल्ह्यात तिसऱ्यांदा गारपीट झाली. मात्र कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही पंचनामे करण्यात आलेले नसून शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई सुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे हे सरकार जर राम राज्याची वल्गना करत असेल, तर या राम राज्यात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस