मुंब्रा : लोकलमधून सर्व प्रवाशांना पूर्वीप्रमाणे प्रवासाची मुभा देण्यात यावी, या मागणीसाठी आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी दिवा रेल्वेस्थानकात रेल रोको आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी आंदोलनासाठी जमलेल्यांना ताब्यात घेतले. लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मुभा दिल्याची घोषणा नुकतीच सरकारने केली होती. यामुळे ज्यांनी एक मात्रा घेतली आहे, तसेच लसीच्या तुटवड्यामुळे ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, अशा प्रवाशांवर अन्याय होत असल्याचा दावा भगत यांनी केला. यावर तोडगा काढण्यासाठी लस घेतलेल्यांसाठी, तसेच न घेतलेल्यांसाठी वेगवेगळ्या लोकल सोडण्याची मागणी त्यांनी केली. मागण्यांचे निवेदन स्टेशन मास्तर आणि पोलिसांना दिले. या आंदोलनात भारत छोडो आंदोलन, तसेच इतर काही संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
दिव्यात रेल रोकोचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:47 AM