शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

बनावट कागदपत्राद्वारे घर विकणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:06 AM

एका इमारतीच्या कागदपत्रांवर दुसरी बेकायदा इमारत बांधतानाच त्याच्या विक्रीसाठी तसेच गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी बनावट बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा व भोगवटा दाखला जोडणाºया भार्इंदरच्या विजय पाटील या विकासकास अखेर नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

मीरा रोड : एका इमारतीच्या कागदपत्रांवर दुसरी बेकायदा इमारत बांधतानाच त्याच्या विक्रीसाठी तसेच गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी बनावट बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा व भोगवटा दाखला जोडणाºया भार्इंदरच्या विजय पाटील या विकासकास अखेर नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रहिवाशांनी माहिती अधिकारात बनावट कागदपत्रांचा प्रकार उघड केला होता.गोडदेव गावामागे हंसा ए व बी या नावाच्या चार मजली दोन इमारती आहेत. हंसा बी इमारत अधिकृत असल्याचे तसेच विकासकाने पालिकेची बनावट कागदपत्रे बनवल्याचे समजताच येथील एका सदनिकेच्या मालक वैशाली सचदेव यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर विकासक साई कन्स्ट्रक्शनचे विजय पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२००६ मध्ये वैशाली यांच्या वडिलांनी या इमारतीत बालाजी भूमी एजन्सीचे इस्टेट एजंट बाबुभाई रावल व प्रकाश जोशी यांच्यामार्फत १० लाख ९९ हजारांना सदनिका विकत घेतली होती. नोव्हेंबर २००६ मध्ये विजय याने नोंदणी करून दिली. नोंदणी करताना विकासकाने मीरा- भार्इंदर महापालिकेची बांधकाम परवानगी व मंजूर नकाशाची प्रतही जोडली होती. त्या कागदपत्रांवर साडेनऊ लाखांचे गृहकर्जदेखील आयसीआयसीआय बँकेने मंजूर केले.दरम्यान, इमारत बांधून झाल्यावर तब्बल ६ वर्षांनी महापालिकेला जाग आली आणि २०१२ मध्ये इमारत बेकायदा असल्याची नोटीस बजावल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. रहिवाशांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या वेळी न्यायालयाने इमारतीतील १४ सदनिकाधारकांना स्वतंत्र नोटीस बजावून निर्णय घेण्याचा आदेश महापालिकेला दिला होता.पहिली नोटीस २०१२ मध्ये दिल्यानंतर तसेच उच्च न्यायालयाने त्यावर आदेश दिले असताना महापालिकेस पुन्हा ५ वर्षांनी जाग आली. पालिकेने मार्च २०१७ मध्ये इमारत बेकायदा असल्याने १५ दिवसांत कारवाई करण्यात येणार असल्याची दुसरी नोटीस बजावली. रहिवाशांनी त्याविरोधात महापालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलनही केले. सध्या रहिवाशांनी ठाणे न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला आहे. गृहनिर्माण संस्था नोंदणीच्यावेळी पाटील चीफ प्रमोटर म्हणून विकासकच होता.महापालिकेचा आशीर्वाद२००६ मध्ये हंसा बी या पूर्ण बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू होऊन पूर्ण झाले असताना पालिकेने वेळीच कारवाई केली नाही. उलट, सर्व सुविधा पुरवल्या. विकासकाने पालिकेचा बनावट भोगवटा दाखला, बांधकाम परवानगी व शिक्के असलेला मंजूर नकाशा बनवला असताना रहिवाशांनी सांगूनही पालिकेकडून मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद देण्यात आली नाही. यावरून एकूणच बेकायदा बांधकामांना महापालिकेचा आशीर्वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा