ठाणे : राष्ट्रवादीमध्ये नाराज पदाधिकाऱ्यांमुळे संघर्ष पेटला असताना बुधवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृह नेते नरेश म्हस्के यांची महापालिकेत भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही भेट वैयक्तिक असल्याचा दावा दोघांकडून केला जात असला तरी यात नवी समीकरणे शिजत असल्याची चर्चा सुरू होती. या भेटीला राष्ट्रवादीच्या एका नाराज गटाने विरोध दर्शवला आहे. परंतु, यामागे महासभेत मुंब्य्रातील नऊ महत्त्वाचे प्रस्ताव असल्यानेच आव्हाडांनी म्हस्केंची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू आहे. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी विविध मुद्यांवरून सत्ताधाºयांना टार्गेट केले आहे. बुधवारी झालेल्या महासभेतही राष्ट्रवादीने सत्ताधाºयांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. तो अद्याप मंजूर झालेला नाही. यानिमित्ताने राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आहे. या संधीचा फायदा घेऊन बुधवारी महासभेत म्हस्के यांनी मुल्ला यांना शिवसेनेत येण्याची आॅफर दिली.
या पार्श्वभूमीवर महासभेच्या आधीच आव्हाड यांनी अचानकपणे म्हस्के यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. महासभेत मुंब्य्राच्या विकासाचे नऊ प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर होते. शिवसेना त्यविरोधात भूमिका घेणार असल्याची कुणकुण राष्टÑवादीला लागली होती.या प्रस्तावांना विरोध होऊ शकतो, अशी पाल आव्हाडांच्या मनात चुकचुकली होती. त्यामुळेच गुरुवारी त्यांनी म्हस्के यांची भेट घेतल्याची चर्चा रंगू लागली. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर राष्टÑवादीकडून पाण्याच्या बाबतीत मांडण्यात आलेल्या लक्षवेधीलासुद्धा पूर्णविराम देण्याचे निश्चित झाल्याचेही बोलले जात आहे. त्यानुसार, महासभेत तसेच घडले. या लक्षवेधीवर चर्चा झाली नाही. तर, वेळेअभावी सभा तहकूब केली असून शुक्रवारी ती होणार आहे. या सभेत मुंब्य्रातील या प्रस्तावांवर विनाचर्चा शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली.महासभेत नगरसेवकांचे अधिकारआव्हाड यांच्या या भेटीमुळे राष्टÑवादीच्या दुसºया गटाने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे आम्ही सत्ताधाºयांविरोधात महासभा, स्थायी समितीमध्ये आवाज उठवतो. परंतु,अशा पद्धतीने आमच्याच नेत्याने सत्ताधाºयांची अशी उघडपणे भेट घ्यावी, हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.महापालिकेत आल्यानंतर आव्हाड हे नेहमीच मला भेटतात. त्यानुसार, आजसुद्धा ते सहजच भेटण्यासाठी आले होते. या भेटीमागे कोणताही वेगळा उद्देश नव्हता. त्यांना आपल्याकडे नाश्ता केला केवळ, इतर काही चर्चा झाली नाही. - नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपायासंदर्भात मला कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया द्यायची नाही.-जितेंद्र आव्हाड,आमदार, राष्टÑवादी