शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर
2
'बेपत्ता' कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला; दोन दिवसांपासून होता गायब, नेमकं काय घडलं?
3
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
4
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
5
शेतकऱ्यांसोबत चर्चा का नाही? उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारवरच उपस्थित केले प्रश्न! शिवराज सिंहांनाही घेतलं निशाण्यावर
6
'बजरंगी भाईजान'मधली 'मुन्नी' आठवतेय? सध्या सोशल मीडियावर रंगलीये तिच्याच फोटोशूटची चर्चा
7
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
8
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
9
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
10
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
11
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
12
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
13
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
14
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
15
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
16
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
17
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
18
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
19
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
20
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'

अविनाश जाधव यांची राजीनामा नाट्यातून माघार; राज यांच्या आदेशानंतर निर्णय घेतल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 5:38 AM

आदेशानंतर आपण हा राजीनामा मागे घेत असल्याचा एक व्हिडीओच जाधव यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सोमवारी प्रसारित केला. त्यामुळे या राजीनामा नाट्यावर अवघ्या  २४ तासांमध्येच पडदा पडला आहे.

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा रविवारी राजीनामा दिला होता. त्याबाबतचे पत्रच त्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले होते. मात्र, राज

यांच्या आदेशानंतर आपण हा राजीनामा मागे घेत असल्याचा एक व्हिडीओच जाधव यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सोमवारी प्रसारित केला. त्यामुळे या राजीनामा नाट्यावर अवघ्या  २४ तासांमध्येच पडदा पडला आहे.

२४ तासांत निर्णय मागे

विधानसभा निवडणुकीमध्ये जाधव यांच्यासह सर्वच्या सर्व १२ उमेदवारांना जिल्ह्यात फटका सहन करावा लागला. पालघरमध्येही मनसेचा पराभव झाला.

निवडणूक काळात जाधव यांनी पालघरमधील उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना सहकार्य केले नसल्याचा आरोप मनसे पालघरचे विक्रमगड तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी थेट  राज ठाकरे यांच्याकडे केला होता.

या सर्वच पार्श्वभूमीवर जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. मात्र, या राजीनाम्याला २४ तास उलटत नाहीत तोच त्यांनी तो मागे घेतल्याचेही आता जाहीर केले आहे.

टॅग्स :MNSमनसे