मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची भाईंदर पूर्वेला असलेल्या बंदरवाडी स्मशान भूमीत सुविधेसाठी महापालिकेने लाखोंचा खर्च चालवला असताना मग खाजगी संस्थेला आंदण कशाला ? असा सवाल बांधलेली अनधिकृत बांधकामे तोडा अशी मागणी भाजपचे सचिव कमलाकर घरत यांनी पालिके कडे केली आहे. परंतु पालिका कारवाईस टाळाटाळ घरत यांनी केला आहे.
भाईंदर पूर्वेला बंदरवाडी येथील गाव खेड्या पासूनची स्मशान भूमी नंतर पालिकेने ताब्यात घेतली . सदर स्मशान भूमी पालिकेने खाजगी संस्था परहित सेवा संघ ला देखभाल - दुरुस्ती साठी देण्यात आली. परंतु सदर संस्थेने सर्व खर्च करणे अपेक्षित असताना महापालिके कडून मोठ्या प्रमाणात विविध कामांसाठी खर्च केला जात आहे . स्मशानभूमीत बेकायदेशीर बांधकामे तसेच खाजगी कार्यक्रमांचे आयोजन जात आहे . येथील स्वच्छता , देखभाली कडे दुर्लक्ष जात असल्याच्या तक्रारी घरत यांनी सातत्याने महापालिके कडे केल्या होत्या.
पालिकेने त्यावर संस्थेस नोटीस बजावली . खुलासा मागवला . तसेच या प्रकरणी सुनावणी आली . तरीसुद्धा प्रत्यक्षात कार्यवाही मात्र केली गेली नाही . संस्थेला जर देखभालीसाठी दिली होती तर सर्व खर्च त्यांनी करण्या ऐवजी पालिकेला भुर्दंड सोसावा लागला . बांधकामे करून त्याचा संस्थेने वाणिज्य वापर चालवला असल्याने पालिकेने स्मशान भूमी विकली का ? असा सवाल घरत यांनी केला आहे . दरम्यान पालिकेने सदर स्मशानभूमीच्या देखभाल - दुरुस्ती आणि दैनंदिन संचालना साठी निविदा मागवली असल्याचे सांगण्यात आले .