ठाणे : जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तुमच्या प्रत्येकात परीक्षा उत्तीर्ण होण्याची पात्रता आहे. परीक्षेची तयारी तुम्ही जिद्दीने केल्यास अपयश तुमच्याकडे फिरकणारही नाही. तुमचा परीक्षेचा अभ्यास करण्याचा हुरूप किती दिवस टिकून राहील यावर तुमचे यश अवलंबून आहे, असे मत विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी व्यक्त केले. समन्वय प्रतिष्ठानतर्फे गडकरी रंगायतनमध्ये स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन भरविले आहे. या संमेलनातंर्गत ‘माझा ध्येयवेडा प्रवास, आम्ही असे घडलो’ या विषयावर व्हटकर बोलत होते. यावेळी ठाण्याचे एसीबीचे पोलीस अधीक्षक संग्राम निशाणदार, पालिका उपायुक्त संजय हेरवाडे उपस्थित होते. त्यांनी आपला या क्षेत्रातील प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. व्हटकर म्हणाले, या संमेलनात येऊन मान्यवरांचे विचार ऐकून तो उत्साह किती दिवस टिकतो हे महत्त्वाचे आहे. केवळ पुस्तक हातात घेऊन बसलो आणि अभ्यासात लक्ष नाही असे केल्यास तुम्ही स्वत:ला फसवत आहात. तुमची वृत्ती अशी असेल तर परीक्षेच्या फंदात पडू नका असा सल्ला त्यांनी दिला. मी स्वत: ही परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झालो, असे ते म्हणाले.संजय हिरवाडे म्हणाले, शाळेत असताना जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सामान्य परीक्षेत जिल्ह्यात तिसरा आलो आणि तेव्हाच स्पर्धा परीक्षा देण्याचे मनाशी निश्चित केले. (प्रतिनिधी)मराठीत ७८ गुण मिळालेसंग्राम निशाणदार म्हणाले, इंजिनियरींग करून अमेरिकेत नोकरी करीत होतो. त्याठिकाणी माझे मन रमत नव्हते. ते सगळे सोडून मी पुन्हा भारतात परतलो. नोकरी सोडल्यामुळे वडील नाराज होते. मराठी भाषा शिक णे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते.ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे हे माझे मामा असल्याने त्यांच्याकडून मराठी शिकण्याचा सराव केला. निकाल समोर आल्यावर मराठीत ७८ गुण मिळाले त्याचा अधिक आनंद होता.
अभ्यासात स्वत:ला फसवणे टाळा
By admin | Published: March 05, 2017 3:21 AM