भिवंडी : आदिवासी जमीनधारकांशी आदिवासी कूळजमीन हक्कांबाबत विविध कायदे महसूल अधिनियमात समाविष्ट असतानाही तालुक्यात एका आदिवासी शेतकºयास आपल्या नावाची नोंद कूळ म्हणून जमीन मालकाच्या सातबाºयावर करण्यासाठी मागील पाच वर्षांपासून तहसीलदार कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणताही न्याय मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.
तालुक्यातील अंजूर या गावामधील विविध मिळकतींचे मालक सोहराबजी मेहरबानजी झुंबर यांच्या नावे असलेली जमीन उंदºया दिवाळ दोडे हे वर्षानुवर्षे कसत असून त्यावर शेती करून ते उदरनिर्वाह करत आहेत. त्यांनी या जमिनीवर कुळ लावण्याबाबत तहसीलदार कार्यालय येथे १९८८ मध्ये दावा दाखल केला होता. त्यावर १९९३ मध्ये सर्व जमिनींच्या सातबाºयावर दोडे यांची इतर हक्कामध्ये कूळ म्हणून नोंद करण्यात यावी,असा निर्णय दिल्यानंतर त्याप्रमाणे १९९४ मध्ये मंडळ अधिकारी यांनी फेरफार क्र मांक ६३२४ प्रमाणे नोंद केली. परंतु हे करत असताना सर्वे क्र. २६७ (जुना सर्व्हे नं.८९) या सातबाºयावर तशी नोंद करण्यात आली नाही. त्यासाठी हे आदिवासी शेतकरी कुटुंबीय मागील काही वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.दरम्यान, मृत झुंबर यांचे वारस रूबी परवेज भिवंडीवाला, फरहाद परवेज भिवंडीवाला, फिरदोस माणेकशा भिवंडीवाला, बेगम फिरोजशा भिवंडीवाला, शहरबानो उर्फ शेरू फिरोजशा भिवंडीवाला यांनी सर्र्वे क्र मांक २६७ या मिळकतीचा मनोज सिंग याच्याशी २०१३ मध्ये विक्र ी करार केला आहे. त्यामुळे फेरफार क्र मांक ७५७४ प्रमाणे सातबाºयावर मनोज यांचे नाव नमूद करून इतर हक्कांमध्ये उंदºया यांचे नाव नमूद न करता हस्तांतरित केली. त्यामुळे जमिनीवरचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दोडे यांचे नातू अविनाश यांनी केला.या जमिनीच्या सातबाºयावर इतर हक्कामध्ये आमच्या आजोबांचे नाव लागावे म्हणून आम्ही तलाठी व तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून त्यासाठी २०१४ पासून तहसीलदार कार्यालयात अर्ज करत आहोत. आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देऊन आमची बोळवण केली जाते. त्यामुळे आम्ही न्याय मागायचा कुणाकडे, असा सवाल अविनाश यांनी उपस्थित केला आहे.