पालघर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमति पालघर जिल्ह्यातील विविध भागात मोटार सायकल रॅली, आणि भव्य दिव्य मिरवणुकीना शहरवासीयांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. तर काही ठिकाणी शिवराज्य कारभाराचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांच्या माध्यमातून शहरात जणू शिवराज्यच अवतरल्याचा भास होत होता. अत्यंत शिस्तबद्ध व पारंपरिक पध्दतीच्या नृत्य, लेझीम पथकांचा तसेच सर्व जाती धर्माचा, पक्षांचा, संस्थांचा समावेश हे मिरवणुकीचे वैशिष्ट ठरले. पालघर मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर आणि हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला. तर युवाशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने पालघर मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, केदार काळे, सुरेंद्र शेट्टी, निलेश राऊत, रोशन पाटील ई. पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ जमून महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून वंदन केले.विक्रमगडमध्ये मिरवणूकविक्रमगडमधील ग्रामस्थ, जुने-नविन शिवसैनिक, पदाधिकारी व शिवभक्त मावळे मंडळ यांच्या सुक्यत विद्यमाने एक गाव एक शिवजयंती हा उत्सव छत्रपती शिवरायांची वेषभूशेमध्ये तसेच मावळयांच्या वेशभुषेत लहान मुले, शिवचरित्रावर आधारित देखावे, शिवछत्रपतींचा पुतळा व ढोलताशांचा गजर आणि जय भवानी, जय शिवाजीचा जयघोषाने वातावरण भारावले होते. बोईसरला पारंपारिक वेशबोईसर : पंचतत्व सेवा संस्था संचालित शांतिरतन विद्यामंदिर कोंडगांव व स्वामी विवेकानन्द एज्यु केशन सोसायटी संचालित प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बोईसर येथे प्रथमच एक आगळ्या पद्धतीने छत्रपति शिवाजी महाराजांची शोभा यात्रा काढण्यात आली होती.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सूर्यवंशी क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष जीतेन्द्र राऊळ यांनी पुष्पहार घालून व पोलीस निरीक्षक के .एस. हेगाजे यांनी श्री फळ वाढवून शोभायात्रेला सुरु वात केली शोभायात्रेत आमदार अमति घोडा पंचतत्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ, सुरेश सहानी, संकपाळ सर, दर्शना राऊळ, मुकेश पाटील, वैभवी राऊत, नीलम संखे, नागेश राऊळ, कल्पेश पिंपळे, मेघन पाटील ,विजय राऊत, विदुर पाटील सहभागी झाले होते. (वार्ताहर)शिवरायांचा जयजयकार महिलांचा सहभागच्या मिरवणूकीसह शहरात सकाळपासूनच वेगवेगळ्या भागात शिवरायांचा तसेच माता जिजाऊ यांचा जयजयकार करण्यात येत होता. या जयघोषाने शहर दणाणले होते. शहरातील विविध रस्त्यांवर दुचाकीस्वार तरु ण हाती भगवा ध्वज घेत छत्रपतींचा जयजयकार करीत फिरत होते.ह्यावेळी त्यांच्यात प्रचंड उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता. च्मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. वेगवेगळ््या माध्यमाच्या विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे महिला, तरु णींनी भगवे फेटे परिधान केले होते. तर लहान मुलांनी महाराजांचा पोशाख परिधान केला होता.
पालघर जिल्ह्यात अवतरले शिवराज्य
By admin | Published: February 20, 2017 5:16 AM