शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

ग्रामपंचायतींचे निवडणूक कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 1:26 AM

Gram Panchayat Election : निवडणूक प्रक्रिया पार पाडणारे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या  मानधनाच्या रकमेपासून वंचित आहेत.

- सुरेश लोखंडे  ठाणे - जिल्ह्यातील १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणूक रिंगणातील दोन हजार ४१३ उमेदवारांसाठी ४७९ मतदान केंद्रांवर गावपाड्यांतील दोन लाख ५० हजार ५०० मतदारांना मतदान केंद्रांवर सेवा देणारे दोन हजार ९०० अधिकारी आणि तीन हजार पोलीस कर्मचारी अद्यापही मानधन मोबदल्यापासून वंचित असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात गावपाडे, खेड्यांचा विकास साधणाऱ्या भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणारे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या  मानधनाच्या रकमेपासून वंचित आहेत. यामध्ये ग्रामीण परिक्षेत्रात पाच उपअधीक्षकांसह दीड हजार पोलीस कर्मचारी तैनात केले होते.  जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाठाणे तालुक्यातील नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या ग्रामपंचायतींच्या ५१सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. पण उमेदवारीअभावी पाच ग्रामपंचायतींत ही निवडप्रक्रिया पार पडली नाही.  सहा जणांच्या पथकावर एका केंद्राची जबाबदारीग्रामपंचायतींच्या मतदानासाठी निश्चित केलेल्या ४७९ मतदान केंद्रांवर तब्बल दोन हजार ९०० अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये एक जनसंपर्क अधिकारी, तीन मतदान केंद्र अधिकारी, शिपाई आणि सुरक्षेसाठी पोलीस, आदी सहा जणांच्या पथकाने एका मतदान केंद्राची जबाबदारी पार पाडलेली आहे.  जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला निवडणूक प्रक्रियेसाठी २१ हजार रुपयांचा निधी दिला आहे. निवडणुकीआधी आठ हजार रुपयांप्रमाणे आणि त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीला १३ हजारांचा निधी वाटप केला आहे. याच निधीतून मानधनाची रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांना देणे शक्यच झाले नाही.   याआधी झालेल्या निवडणुकांचा निधी व मानधन वेळच्या वेळी वाटप झाले. आहे.    - राजाराम तवटे,     तहसीलदार, ठाणे 

टॅग्स :Electionनिवडणूकthaneठाणे