- सदानंद नाईक
उल्हासनगर : प्रांत कार्यालय प्रांगणात नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली असून गेल्या एका वर्षांपासून फर्निचर अभावी इमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. इमारती मध्ये प्रांत कार्यालयासह सहायक पोलिस आयुक्त कार्यालय व अन्य शासकीय कार्यालये असणार आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ पवई चौकात उपविभागीय अधिकारी कार्यालय असून त्या शेजारी सहायक पोलिस उपायुक्त कार्यालय आहे. दोन्ही कार्यालय बैरेक इमारती मध्ये असून बैरेक मोडकळीस आल्या आहेत. अखेर शासनाने साडे पाच कोटीच्या निधीतून प्रांत कार्यालयाच्या खुल्या प्रांगणात नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याला मंजुरी दिली. गेल्या २ वर्षांपासून इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र एका वर्षांपासून इमारती मधील नियोजित कार्यालयातील फर्निचरचे काम बाकी आहे. फर्निचर कामाच्या निधीला मंजुरी मिळताच फर्निचरचे काम होऊन इमारतीचे उदघाटन होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता संदीप चव्हाण यांनी दिली.
दुमजली इमारतीच्या महिला मजल्यावर प्रांत कार्यालय तर दुसऱ्या मजल्यावर विविध शासकीय कार्यालय व तळमजल्यावर सहायक पोलिस आयुक्त कार्यालय असणार आहे. दोन वर्षांपासून इमारत बांधून पूर्ण झाली मात्र फर्निचर अभावी इमारत धूळ खात पडली. फर्निचर कामाच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर, फर्निचरच्या कामाला सुरुवात होणार आहे. प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी नवीन इमारतीचे आकर्षण सर्वांना लागून राहिले असून फर्निचरचे काम पूर्ण झाल्यावर, इमारतीचे उदघाटन होणार आहे. अशी प्रतिक्रिया देऊन याबाबत उच्चस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कारभारी यांनी दिली. या इमारती सोबतच तहसील कार्यालयात नवीन प्रशासकीय इमारत बांधून पूर्ण झाली. महापालिकेने इमारत ताब्यात घेऊन त्या मध्ये कोरोना आरोग्य केंद्र सुरू केले. त्या इमारती मध्येही फर्निचरचे काम बाकी असून विविध शासकीय कार्यालय इमारतीमध्ये सुरु होणार आहे.
दिवाळीपूर्वी इमारतीचे उदघाटन- चव्हाण
प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभ्या राहिलेल्या प्रशासकिय इमारती मध्ये विविध शासकीय कार्यालयाने सुरू होणार आहे. फर्निचरच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर फर्निचर काम पूर्ण झाल्यावर इमारतीचे उदघाटन होण्याचे संकेत बांधकाम विभागाचे उपअभियंता संदीप चव्हाण यांनी दिली.