लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलीस सेवेतील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ठाणे शहर मुख्यालयाचे उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्यासह सलग १५ वर्षे सेवेत उत्तम कामगिरी बजावणा-या १८ पैकी १७ पोलिसांना सोमवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी चार अधिका-यांना नक्षलग्रस्त भागात २०१५ साठीचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक बहाल करण्यात आले. आयुक्तांसह गौरवमूर्ती पोलिसांनी यावेळी सोशल डिस्टसिंगच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी केली.गुणवत्तापूर्ण कामगिरी बजावणा-या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना दरवर्षी महाराष्ट्र दिनी १ मे रोजी ध्वजारोहणानंतर संबंधित जिल्हयाचे पालकमंत्री पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा सोहळा साध्या पद्धतीने साजरा झाला. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १७ जणांना पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या आवारातील हिरवळीवर ही सन्मानचिन्हे ४ मे रोजी सायंकाळी प्रदान करण्यात आली. यामध्ये पोलीस दलात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणा-या पोलीस मुख्यालय दोनचे उपायुक्त प्रशांत मोहिते यांना २०१९ या वर्षासाठी हे सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले. याशिवाय, सलग १५ वर्षे प्रशंसनीय उल्लेखनीय कामगिरी करणाºया ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातील ठाणे शहर युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, वागळे इस्टेट युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस आयुक्त कार्यालयातील वाचक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय घोसाळकर, पोलीस हवालदार एस. आर. जाधव, हवालदार गणेश भोसले (भिवंडी), संजय माळी (उल्हासनगर),अंकुष भोसले (खंडणी विरोधी पथक), रविंद्र पाटील (युनिट-१), आणि नितीन ओवळेकर (खंडणी विरोधी पथक) आदीं गुन्हे अन्वेषण विभागातील नऊ जणांचा समावेश होता. याशिवाय, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, जमादार दत्ताराम पालांडे (वाहतूक शाखा), पोलीस हवालदार प्रियंका काते (कोपरी), विना अपघात उत्तम वाहन चालविणारे हवालदारनुरु खान, पोलीस नाईक निसार पिंजारी (बाजारपेठ), नरेंद्र बागुल (मानपाडा) आणि क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य दाखविणाºया मुख्यालयातील पोलीस शिपाई अरुणा सावंत यांचाही यात समावेश होता.चौघांना आंतरिक सुरक्षा सेवा पदकनक्षलग्रस्त भागात २०१५ मध्ये चोखपणे कामगिरी बजावणारे भिवंडीचे पोलीस उपायुक्त अंगद शिंदे, पोलीस निरीक्षक अजय कांबळे (भिवंडी शहर), सहायक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्या (मानपाडा), उपनिरीक्षक कैलास टोकले (शांतीनगर) आणि सागर ढिकले (बदलापूर पूर्व ) यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहिर झाले होते. यातील उपायुक्त शिंदे वगळता उर्वरित चौघांना हे पदक पोलीस आयुक्तांनी प्रदान केले.* दरम्यान, मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनाही महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. मात्र, चारच दिवसांपूर्वी ते कोरोनामुक्त झाल्यामुळे ते विलगीकरणात असल्यामुळे ते या सोहळयाला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.* यापुढेही अशीच कामगिरी करा..सन्मानचिन्ह मिळविलेल्या पोलिसांचे कौतुक करतांनाच यापुढेही अशीच गुणवत्तापूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला फणसळकर यांनी दिला. कोरोनाशी लढा देतांना स्वत:ची, कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या. यापुढेही बराच काळ सोशल डिस्टसिंगच्या नियमांची अमलबजावणी करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ठाणे आयुक्तालयातील १७ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान
By जितेंद्र कालेकर | Published: May 05, 2020 9:42 PM
सोशल डिस्टसिंगची काटेकोर अंमलबजावणी करीत ठाण्यातील पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्यासह १७ पोलिसांना सोमवारी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नक्षलग्रस्त भागातील चांगल्या कामगिरीबद्दल अन्य चार अधिकाऱ्यांनाही यावेळी आंतरिक सुरक्षा सेवापदक प्रदान करण्यात आले.
ठळक मुद्देउपायुक्त प्रशांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि जयराज रणवरे यांचाही समावेशचार अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त भागातील आंतरिक सुरक्षेचे सेवा पदक बहाल