लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अनेकदा वाहतूकीचे नियम पाळले न गेल्याने गंभीर स्वरुपाचे अपघात होतात. त्यामुळे सुरक्षित आणि विना अपघात प्रवासासाठी वाहतूकीचे नियम पाळा असा सल्ला नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सांताक्लॉझने बुधवारी ठाण्यात दिला.वाहतूकीचे नियम पाळून सुरक्षित प्रवास करण्यासाठी वाहन चालकांना ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी उद्बबोधन केले. नाताळ निमित्त वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याच्या मोहीमेचा प्रारंभ ठाण्यातील तीन हात नाका येथील पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयापासून करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे मार्गदर्शन केले. यावेळी राबोडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पावले, कासारवडवलीचे दत्तात्रय ढोले, नौपाडयाचे सुनिल घुगे, कविता गावीत यांच्यासह वाहतूक शाखेचे अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. वाहतूकीचे पालन करणाºया वाहन चालकांना पोलिसांच्या सांताक्लॉझने यावेळी बक्षीस दिले. तर ज्यांनी पालन केले नाही, त्यांना पोलिसांच्या उपस्थितीमध्ये लगेच ई चलनाची दंडात्मक पावती देण्यात येत होती. यामध्ये प्रामुख्याने भरघाव वेगाने वाहन चालविणारे, विना सीट बेल्ट वाहन चालविणारे, सिग्नल तोडणारे आणि विना हेल्मेट दुचाकी चालविणाºया चालकांचा समावेश होता.ठाणे आयुक्तालयातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर व भिवंडीसह १८ युनिटमध्ये १८ सांताक्लॉजच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.
‘‘ अपघातांचे प्रमाण हे दहा टक्क्यांनी कमी व्हावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर या आधी गणेशोत्सवाच्या काळातही अशा प्रकारे जनजागृती करण्यात आली होती. आता ती नाताळनिमित्त केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करावे. अपघात होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे.’’अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर