ठाणे : अनेकदा वाहतुकीचे नियम पाळले न गेल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. त्यामुळे सुरक्षित आणि विनाअपघात प्रवासासाठी वाहतूक नियम पाळा, असा सल्ला नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सांताक्लॉजने बुधवारी ठाण्यात दिला.
वाहतूक नियम पाळून सुरक्षित प्रवास करण्यासाठी वाहनचालकांचे ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी उद्बोधन केले. नाताळच्या मुहूर्तावर या जनजागृती मोहिमेचा प्रारंभ ठाण्यातील तीनहातनाका येथील पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयापासून करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे मार्गदर्शन केले. यावेळी राबोडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पावले, कासारवडवलीचे दत्तात्रेय ढोले, नौपाड्याचे सुनील घुगे, कोपरीच्या कविता गावित आणि प्रशासन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह वाहतूक शाखेचे अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेचे ठाणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले असून पोलिसांचे आभार मानले आहेत.अपघातांचे प्रमाण हे १० टक्क्यांनी कमी व्हावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर यापूर्वी गणेशोत्सवातही अशा प्रकारे जनजागृती केली आहे. आता ती नाताळनिमित्त केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करावे. अपघात होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे.’’अमित काळे, पोलीस उपायुक्त,वाहतूक नियंत्रण शाखा,ठाणे शहर१८ युनिटमध्ये होत आहे जनजागृती, ठाणे-डोंबिवलीकरांकडून होत आहे स्वागतवाहतूक नियमांचे पालन करणाºया वाहनचालकांना पोलिसांच्या सांताक्लॉजने यावेळी बक्षीस दिले. तर, ज्यांनी पालन केले नाही, त्यांना सांताक्लॉजच्या उपस्थितीमध्ये पोलिसांकडून लगेच ई-चलनाची दंडात्मक पावती देण्यात येत होती. यामध्ये प्रामुख्याने भरधाव वेगाने वाहन चालविणारे, विनासीटबेल्ट वाहन चालविणारे, सिग्नल तोडणारे आणि विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºया चालकांचा समावेश होता. ठाणे आयुक्तालयातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर व भिवंडीसह १८ युनिटमध्ये १८ सांताक्लॉजच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.