- प्रशांत मानेकल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील निवडणूक रिंगणात आहेत. ठाणे महापालिकेत नगरसेवक असलेले पाटील पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. विजयासाठी कार्यकर्त्यांसोबतच पाटील यांचे संपूर्ण कुटुंबच प्रचारात उतरले आहे. पत्नी सुनीता पाटील, मुलगा आकाश आणि शुभम पाटील यांनी बाबाजी यांच्या विजयासाठी प्रचार सुरू केला. कळवा-मुंब्रा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पाटील हे कल्याण ग्रामीणमधील रहिवासी असल्याने स्थानिक असल्याचा मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्याचबरोबर ते आगरी समाजाचे असल्याने ग्रामीणसह डोंबिवली, कल्याण पूर्व, अंबरनाथमधील आगरी समाजही त्यांना मतदान करू शकतो.बाबाजी पाटील । राष्ट्रवादीबाबाजी हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्याचबरोबर ते ठाणे महापालिकेत प्रभाग क्रमांक २९ चे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. ते शिक्षण मंडळाचे माजी सदस्यही आहेत. निवडणुकीच्या प्रचारात व्यक्तिगत भेटीगाठींवर त्यांनी सर्वाधिक भर दिला आहे. रोड शो आणि मेळाव्यांच्या माध्यमातूनही त्यांचा प्रचार सुरू आहे.पत्नी । सुनीता पाटीलसुनीता पाटील या गृहिणी आहेत. त्याही निवडणुकीच्या निमित्ताने बाबाजींच्या प्रचारात उतरल्या आहेत. कल्याण ग्रामीण, अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये त्या प्रचार करत आहेत. नातेवाइकांच्या भेटी घेऊन प्रचार करण्यावर त्यांचा भर आहे.मुलगा । आकाश पाटीलआकाश पाटील हा एमबीए असून तोही वडिलांच्या प्रचारात उतरला आहे. पूर्ण प्रचाराची मोहीम आकाश सांभाळत आहेत. ५० जणांची विशेष टीम तयार केली आहे. पूर्ण लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेण्यावर त्यांचा भर आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करत आहेत.मुलगा । शुभम पाटीलशुभम पाटील यांनीही एमबीएचे शिक्षण घेतले आहे. बाबाजींच्या प्रचार दौऱ्यांचे पूर्ण नियोजन ते बघत आहेत. अंबरनाथ, उल्हासनगर, मुंब्रा-कळवा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघांत भेटीगाठी घेणे, दौरे करणे आदींच्या माध्यमातून शुभम यांचा प्रचार सुरू आहे.
प्रचारात उतरलेय अवघे बाबाजी पाटील कुटुंबीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:49 PM