शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पालिका बॅकफूटवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:39 AM

ठाणे ग्रामीण पोलीस व मीरा- भार्इंदर महापालिकेने शहरातील अनैतिक व्यवसायाला दणका देण्यासाठी सुरू केलेल्या लॉज व आॅर्केस्ट्रा बारवरील कारवाईला पालिकेनेच ब्रेक लावला आहे.

मीरा रोड : ठाणे ग्रामीण पोलीस व मीरा- भार्इंदर महापालिकेने शहरातील अनैतिक व्यवसायाला दणका देण्यासाठी सुरू केलेल्या लॉज व आॅर्केस्ट्रा बारवरील कारवाईला पालिकेनेच ब्रेक लावला आहे. पालिका, पोलीस व बार - लॉज चालकांच्या बंद सभागृहात झालेल्या बैठकीत आठवड्याभरात बेकायदा बांधकामे तोडा अन्यथा पालिका कारवाई करेल असा इशारा आयुक्तांनी दिला. यामुळे बार - लॉज चालकांना न्यायालयातून स्थगिती मिळवण्यास संधी मिळण्याची शक्यता असून सत्ताधाºयांच्या दबावानंतर पालिकेने नमते घेतल्याची व या मुळे आॅर्केस्ट्रा बार - लॉज वरील कारवाई बारगळण्याची शक्यता आहे.शहरात शरीरविक्रय व्यवसाय मोठा असून बहुतांशी आॅर्केस्ट्रा बार व लॉजच्या आड हा सर्रास चालतो. याआधी पोलिसांनी वेळोवेळी बेकायदा व्यवसाय प्रकरणी अनेक बार - लॉजवर गुन्हे दाखल केले आहेत. तर बेकायदा व्यवसाय चालणाºया लॉज व बारची बहुतांश बांधकामे अनधिकृत असल्याने ती तोडण्याची मागणी पोलीस, काही लोकप्रतिनिधी, संस्था व नागरिकांनीही केली आहे. पण पालिका कारवाई टाळत होती.ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी लॉज व बारची बांधकामे तोडण्याचा आग्रह सातत्याने पालिकेकडे धरला होता. आयुक्त डॉ. नरेश गीते यांनीही कारवाईसाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे महापौर डिंपल मेहता यांनी पालिका, पोलिसांची बैठक घेऊन लॉजवर कारवाईचा निर्णय घेतला होता. पालिका व पोलिसांनी भार्इंदर पूर्वेतील बारवर थेट कारवाई केली.बार व लॉज चालकांनी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांची भेट घेऊन महापालिका मनमानी करत असल्याचा आरोप केला. सामानही काढू न देता कारवाई करत असल्याबद्दल तक्रार केली होती. दरम्यान, भाजपाचे नगरसेवक अरविंद शेट्टी व गणेश शेट्टी हे स्वत: लॉज व आॅर्केस्ट्रा बारशी संबंधित असून त्यांच्यावर पीटा सारखा गंभीर गुन्हाही दाखल आहे.पालिका व पोलिसांनी कारवाई सुरु केल्यावर सत्ताधाºयांकडून दबाव वाढल्याची चर्चा सुरु झाली. तर सुमारे १९ लॉज - बार चालकांनी कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. बार व लॉज वरील कारवाईने धास्तावलेल्या काशिमीरा भागातील मोठ्या संख्येने असलेले आॅर्केस्ट्रा बार व लॉज चालकांनी बैठक घेतली. काशिमीरा हॉस्पीटालीटी आणि एन्टरटेनमेंट असोसिएशननेच पालिकेला बैठक घेण्याची विनंती केली. त्यानुसार आयुक्त डॉ. गीते यांनी मंगळवारी बैठक घेतली. अरविंद शेट्टी व गणेश शेट्टी यांच्यासह उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, दीपक पुजारी, वरिष्ठ निरीक्षक विलास सानप आदी उपस्थित होते.बैठकीत आयुक्तांनी बार व लॉजमधील बेकायदा बांधकाम आठवड्याभरात काढून टाका. अन्यथा पालिका तोडेल व गुन्हाही दाखल करेल असा इशारा दिला. ज्यांच्याकडे परवानगी आहेत, ग्रामपंचायत काळातील मंजुर नकाशे आहेत ते सादर करा. बांधकाम नियमित करणे शक्य असेल तर तसे प्रस्ताव द्या असे सांगितल्याचे समजते. महापौर डिंपल मेहता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक