शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

बदलापूरच्या आदिवासीने शोधले शेतीसाठी बिनविजेचे यंत्र

By admin | Published: January 01, 2017 3:45 AM

अनेकदा जवळ पाण्याचे स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना तिच्या मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही. यावर बदलापूरजवळील चोण

- पंकज पाटील, बदलापूर अनेकदा जवळ पाण्याचे स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना तिच्या मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही. यावर बदलापूरजवळील चोण गावात राहणाऱ्या रामचंद्र खोडका या आदिवासी समाजातील व्यक्तीने या समस्येवर उपाय शोधला आहे. जुजबी यांत्रिक कौशल्याच्या बळावर पाण्याच्याच प्रवाहाचा वापर करून विनाइंधन पाणी उपसा करणारे यंत्र त्यांनी तयार केले आहे. त्यातून ते शेतीला पाणी पुरवतात, पण लवकरच त्यावर वीजनिर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या चोण गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीच्या प्रवाहात त्यांनी हे यंत्र बसविले असून त्याद्वारे कोणतेही इंधन न वापरता पाणी उपसले जात आहे. या यंत्राच्या पेटंटसाठीही त्यांनी अर्ज केला आहे. आयटीआयमधून वेल्डरचा पदविका अभ्यासक्र म पूर्ण केलेल्या खोडका यांनी काही काळ स्वत:चे वर्कशॉप टाकून व्यवसाय केला. नंतर राज्य परिवहनच्या कर्जत आगरात तांत्रिक कारागिर म्हणून त्यांची नेमणूक झाली. नोकरीबरोबरच चोण गावात ते शेतीही करतात. गावालगत नदी असूनही विजेअभावी त्यांना शेतीसाठी पाणी उपसून आणता येत नव्हते. डिझेलवर मोटर चालविणे परवडणारे नव्हते. त्यामुळे कोणत्याही इंधनाचा वापर न करता नदीतले पाणी उपसून आणता येईल का, याचा विचार ते करू लागले. धरणामुळे बारवी नदी बारमाही वाहती आहे. प्रवाहाच्या शक्तीमुळे नदीपात्रात त्यांनी बसविलेला चार पात्याचा लोखंडी पंखा फिरतो आणि पाणी उपसले जाते. या प्रक्रि येत कुठेही वीज, डिझेल अथवा अन्य कोणतेही इंधन वापरले जात नाही. उलट उपसल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाद्वारे वीजनिर्मिती करणेही शक्य होते. दीड वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. विनाइंधन पाणी उपसा करणारे हे यंत्र बनविण्यासाठी त्यांना ६० हजारांचा खर्च आला. मात्र हा खर्च त्यांच्यासाठी कायमस्वरुपी झाला आहे. पाण्याविना शेत राहत नसल्याने बारमाही शेतीचा मार्ग त्यांनी मोकळा केला आहे. स्वत:चे कौशल्य वापरुन त्यांनी ही किमया साध्य केली आहे. आता या यंत्रात अजून काही सुधारणा करणे शक्य आहे का, याची चाचपणी सुरू आहे. ‘‘साधारण पावसाळ्यानंतर शेतीत कोणतेही पीक घ्यायचे म्हटले, तर नदीतून पाणी उपसा करण्यासाठी वीज अथवा डिझेलचा खर्च करावा लागतो. या यंत्राने तो खर्च पूर्णपणे वाचेल. शिवाय काही प्रमाणात वीजनिर्मिती होईल. या यंत्राची फारशी देखभाल करावी लागणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त आहे. - रामचंद्र खोडका, चोण