शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बदलापूर : वीज ग्राहकाला ८२ हजाराचे बिल, महावितरणची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 2:37 AM

वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्बल ८२ हजार रुपये पाठवले आहे. मीटर सदोष असल्याने हा प्रकार घडल्याचे माहित असतानाही महावितरण ग्राहकाला नाहक त्रास देत आहे.

बदलापूर : वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बिल वाढवून दिले जात आहे. हजार, दोन हजार रुपये वाढवून बिल देणा-या महावितरणने बदलापूरमध्ये एका ग्राहकाची चांगलीच थट्टा केली आहे. महिन्याला हजार ते दीड हजार रुपये बिल येणा-या ग्राहकाला महिन्याचे बिल तब्बल ८२ हजार रुपये पाठवले आहे. मीटर सदोष असल्याने हा प्रकार घडल्याचे माहित असतानाही महावितरण ग्राहकाला नाहक त्रास देत आहे.बदलापूरच्या जाधव कॉलनीत राहणा-या निलीमा चिंदरकर यांना दर महिन्याला दीड हजाराच्या आतच वीज बिल येत होते. मात्र त्यांच्या मीटरमध्ये दोष आल्याने गेल्या महिन्याचे त्यांचे बिल तब्बल ८२ हजार आले आहे. विजेचा वापर हा घरगुती असतानाही त्यांना एका महिन्याचे विजेचे युनिट ५ हजार ६९३ दाखवले आहे. एवढे युनीट वापरलेच नाही तर मग इतके पडलेच कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. हा प्रकार येथेच थांबलेला नाही. त्यांना एका महिन्याचे विजेचे बिलही ८२ हजार दाखवण्यात आले आहे. या बिलावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांच्या विजेच्या मीटरमध्ये बिघाड झालेला आहे. मात्र त्याची तपासणी न करता सरसकट बिल पाठवण्याचे काम महावितरणने केले आहे.या प्रकरणी अधिका-यांना जाब विचारल्यावर त्यांनी लागलीच निम्मे बिल कमी करून ४० हजार बिल दिले. मात्र इतकी रक्कम भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे चिंदरकर यांनी स्पष्ट केले.महावितरण विभागाच्या चुकीच्या यंत्रणेचा फटका हा नाहक ग्राहकांना बसत आहे. असे असताना त्यांनी यंत्रणेत सुधारणा न करता थेट ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महावितरणाच्या कारभाराचा अनेकदा फटका ग्राहकांना बसत असून सदोष मीटरमुळे बदलापूर, अंबरनाथ शहरांमध्ये ग्राहक त्रस्त आहेत. त्यात बदलापूर आणि अंबरनाथसारख्या शहरात तब्बल २० हजाराहून अधिक वीज मीटर सदोष असल्याचे नुकतेच समोर आले होते.त्यानंतर नवे मीटर मिळावे म्हणून लाच घेतली जात असल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यामुळे मीटरच्या संदर्भातील महावितरणाच्या चुकांमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.चूक महावितरणची, फटका ग्राहकालामहावितरणाची चूक असतानाही अशा तक्र ारींमध्ये ग्राहकांनाच १८० रूपये भरून आपले सुस्थितीत असलेले मीटर तपासून घ्यावे लागते. त्यामुळे ग्राहकात संतापाचे वातावरण आहे. अशा अव्वाच्यासव्वा बिलांची संख्या शहरात मोठी असून सदोष मीटर युनिट तपासणी यंत्रणा आणि मीटरमुळे हा प्रकार होत असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनीच स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकरणात अधिकृत प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.

टॅग्स :badlapurबदलापूर