बदलापूर: कुळगाव- बदलापूर नगरपरिषद हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनाने खबरदारीची उपाययोजना करण्यास स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषद प्रशासनाने फेरीवाल्यांना रस्त्यावर बसण्यास मनाई केली आहे.
कुळगाव- बदलापूर नगरपरिषद प्रशासनाने गुरुवार (ता.१८) पासून फेरीवाल्यांना प्रतिबंध केला आहे. त्यामुळे गुरुवारपासून पुढील आदेश येईपर्यंत रस्त्यावर कोणत्याही विक्रेत्यांना विक्री करता येणार नाही. यामध्ये भाजी, फळेविक्रेत्यांसह खाद्यपदार्थांच्या हातगाडी विक्रेत्यांनाही प्रशासनाने रस्त्यावर बसण्यास मनाई केली आहे. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत बदलापूर पूर्व आणि पश्चिम परिसरात रस्त्यावर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, त्यात सातत्य नव्हते. आतापर्यंत बदलापुरात कोरोनाचे ९६१३ रुग्ण आढळले असून त्यातील ९३६९ रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांहून अधिक आहे. १२५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर ११९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
...........
वाचली