बदलापूर : येथील पूर्वेकडील MIDC भागातील एका केमिकल प्लांट मध्ये वायू गळती झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून सदर कंपनीमध्ये जाऊन वायू गळतीचे कॉक बंद कले आहे. सध्या प्रशासनाकडून कंपनीची पाहणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास शिरगाव एम. आय.डी.सी., आपटेवाडी, बदलापूर येथे मे. नोबेल इंटरमीडिएट्स प्रा.ली. या कंपनीमध्ये ओव्हरहिटमुळे सल्फुरिक अॅसिड व बेंझिल्स अॅसिडमध्ये केमिकल रिअॅक्शन होऊन गॅस गळती झाली होती. त्यामुळे ३ किलोमीटरच्या परिसरातील लोकांना श्वास घेण्यास व डोळे चुरचुरण्याचा त्रास होत होता. सदर घटनास्थळी बदलापूर आणि अंबरनाथ अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून गँस गळती थांबविण्यात आली असून रात्री ११.३० च्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
बदलापूर : पूर्वेकडील MIDC परिसरात केमिकल प्रकल्पात वायूगळती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 11:35 PM
प्रशासनाची घटनास्थळी धाव. वायुगळतीचे कॉक करण्यात आले बंद.
ठळक मुद्देप्रशासनाची घटनास्थळी धाव. वायुगळतीचे कॉक करण्यात आले बंद.