ठाणे - एकीकडे कोरोनाचे सावट असताना दुसरीकडे त्यातही आपला स्वार्थ बघणाऱ्याचे प्रकरण समोर आले आहे. औषध फवारणीचे देयक मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या बदलापूर नगरपरिषदेतील लिपीकाला शुक्रवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विजय कदम (४२) असे या लिपीकाचे नाव असून त्याने ५ हजार २०० रूपयांच्या लाचेची मागणी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बदलापूर नगरपरिषदेतील आरोग्य विभागात विजय कदम हा कार्यरत आहे. तर तक्रारदाराचे बदलापूर परिसरात औषध फवारणीचे कंत्राट आहे. त्याचे देयक मंजूर करण्यासाठी तक्रारदार विजय कदम याच्याकडे गेले होेते. त्यावेळी विजयने तक्रारदाराकडून ५ हजार २०० रूपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर शुक्रवारी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणाची तक्रार दाखल केली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणाची तपासणी केली असता, विजयने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बदलापूर नगरपरिषदेत सापळा रचून विजय कदमला लाच घेताना हातोहात पकडले. याप्रकरणी विजय कदम विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पाकिस्तानातील गाढवांची संख्या वाढली; 'या' देशासाठी फायदेशीर ठरली
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...
Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू
CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ
CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...