शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. १ पूर्णपणे बंद होणार नाही!

By पंकज पाटील | Published: February 03, 2024 6:05 PM

ठाणे येथे लवकरच रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे ते म्हणाले.

बदलापूरबदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. १ हा बॅरिकेटींगद्वारे पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ असलेल्या हजारो रेल्वे प्रवाशांना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलासा दिला आहे. होम प्लॅटफॉर्म व प्लॅटफॉर्म क्र. १ मध्ये संपूर्ण बॅरिकेटींग लावण्याऐवजी केवळ रेल्वेचे काम सुरू असलेल्या २० मीटर जागेवर बॅरिकेटींग करण्यात येणार असल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली आहे.     बदलापूर पूर्वेला अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ही माहिती दिली. बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. १ हा बंद केल्यानंतर प्रवाशांचे हाल होणार असल्याच्या तक्रारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत कपिल पाटील यांनी शनिवारी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट देत रेल्वे  प्रवासी व प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी मध्य रेल्वे व एमआरव्हीसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. बदलापूर रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येणार असून, १२ मीटरचे दोन प्रशस्त पूल, सहा एक्सलेटर आणि तीन लिफ्ट बसविण्यात येत आहे. प्रवाशांची काही काळ गैरसोय होणार असली, तरी भविष्यातील सुविधांसाठी प्रवाशी व रेल्वे यांच्यात `सुवर्णमध्य' काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. रेल्वे स्थानकातील कामांबाबत रेल्वे प्रशासनाकडून पुढील १५ दिवस वॉक थ्रू घेऊन सुविधांबाबत चाचपणी केली जाईल. त्यानंतर २० फेब्रुवारीनंतर प्रवाशी संघटना व प्रवाशांच्या उपस्थितीत संपूर्ण कामांचे सादरीकरण केले जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे श्री. कपिल पाटील यांनी सांगितले. ठाणे येथे लवकरच रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असे ते म्हणाले.

लवकरच होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे २० ते २५ फेब्रुवारीदरम्यान उद्घाटन केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. खासदारकीच्या पहिल्या टर्मपासून कपिल पाटील यांनी होम प्लॅटफॉर्मसाठी पाठपुरावा केला होता. या कामातील तांत्रिक अडथळे व भूसंपादनाचा तिढा दूर करीत अखेर होम प्लॅटफॉर्म साकारला आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर