बदलापूर - चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापूरमध्ये गुरुवारी दुपारी एका खाजगी शाळेची बस थेट दुकानाला धडकली. बदलापूर पश्चिमेतील गणोश चौक भागात झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातानंतर बसचालकाने विद्याथ्र्याना बाहेर काढण्याऐवजी पळ काढला. स्थानिक रहिवाशांनी लागलीच बसमधील विद्यार्थाना बाहेर काढले.
एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची ही बस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुपारी दीडच्या सुमारास विद्यापीठ रस्त्याच्या उतारावरून गणोश चौकात येताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. ताबा सुटल्याचे जाणवताच या चालकाने बसमधून उडी घेऊन पोबारा केला. मात्र शाळेची ही बस गणोश चौकात असलेल्या मंगलज्योत इमारतीतील पूजा साहित्य विक्र ीच्या दुकानाला धडकली. या घटनेने बसमधील विद्यार्थी घाबरले होते. स्थानिकांनी तातडीने या विद्याथ्र्याना बसमधून उतरवत बाजूला केले. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने दुकानाच्या शेजारी असलेल्या विजेच्या खांबामुळे आणि दुकानाला लावलेल्या लोखंडी जाळयांमुळे बस थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसचालक नवीन असल्याने त्याला वाहनावर नियंत्रण ठेवणो जमले नसल्याची माहिती पुढे आली आहे. बसची दुकानाला लागलेली धडक इतकी जोरात होती की इमारतीतील दुस:या मजल्यापर्यंत याचे धक्के जाणवले. तसेच नेहमी वर्दळीच्या असलेल्या गणोश चौकातील रस्त्यावर कुणीही व्यक्ती नसल्याने मोठा अपघात टळला.