ठाणे/बदलापूर : दसऱ्यानिमित्त मंगळवारी कार्यालयांना सुट्टी असल्याने चाकरमान्यांनी सोमवारीच जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये दसरा साजरा केला. लोकलमधील विविध ग्रुप्सनी लोकलला हार, तुरे, फुगे, पताका लावत देवीच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर ग्रुप्समधील सहकाऱ्यांबरोबर डब्यांमध्ये प्रसाद व अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. तर बदलापूर स्थानकातील रेल्वेचे निर्बंध लक्षात घेत महिलांनी अगदी साधेपणाने भोंडल्याचा फेर धरला. तर काहींनी फुगड्यांचा आनंद लुटला.पूर्वी अत्यंत उत्साहाने हा दसरा साजरा होत असे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वे सुरक्षा दलाने कडक निर्बंध घातले. सोमवारी प्रवाशांना सुरक्षेचे नियम पाळत घाईघाईत व शांततेत पूजन केले. सकाळी ७.५६ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकलचे प्रवाशांनी मोठ्या उत्साहाने सजावट करत पूजन केले. कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांनी पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा केला.
बदलापूर स्थानकात भोंडला
By admin | Published: October 11, 2016 2:48 AM