बदलापूर : मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर आणि परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. बारवी धरण आणि उल्हास नदी भरून वाहत असल्याने बदलापूरला अद्यापही धोका कायम आहे. पावसाने पूर्णत उघडीप दिलेली नसून अधूनमधून पाऊल पडत असल्यामुळे येथीव नागरिकांच्या मनात धास्ती कायम आहे. एका बाजूला शहरातील बाजारपेठा, वाहतूक सुरळीत होत असली तरी दुसऱ्या बाजूला पुरात भिजलेले साहित्य फेकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. घरातील सामानाची आवराआवर हे सध्या करत आहेत.पुरात ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयामुळे सुरक्षिततेसाठी वीज पुरवठा खंडित केला होता. आता तो पूर्ववत करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून महावितरणकडून काम सुरू झाले आहे. यामुळे अधूनमधून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू आहे. जुलैमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना आता मदत मिळाली असताना दुसºया पुरात पुन्हा नुकसान झाल्याने ही केव्हा मिळणार असा प्रश्न येथील रहिवाशांनी विचारला आहे. या रहिवाशांना सरकार किंवा पालिकेकडून म्हणावी तशी मदत अजून मिळेलेली नाही. बदलापूर पूर्वेतील हेंद्रेपाडा, बॅरेज रोड, रमेशवाडी, सोनिवली, यादवनगर, वालिवली या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
बदलापूरला पुराचा धोका कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 2:31 AM