ठाणे - टिटवाळा उपनगरी रेल्वेमध्ये अमृता कवठणकर (२६) या महिलेची लॅपटॉप असलेली बॅग गहाळ झाल्याची माहिती ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने या बॅगेचा शोध घेऊन कवठणकर यांना शनिवारी सुपूर्द केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) स्थानक येथे ३० जानेवारी रोजी सकाळी टिटवाळा मार्गावरील धिम्या रेल्वेतील महिलांच्या बोगीत लॅपटॉपची बॅग विसरल्याची माहिती ठाणे आरपीएफला मिळाली. पोलीस उपनिरीक्षक नवीन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अंमलदार सुजाता मालवीय यांनी या शोध सुरु केला. संबंधित रेल्वे दुपारी ठाणे स्थानकात आली. त्यावेळी ही बॅग मालवीय यांना मिळाली. मुंबईतील बँकेत लेखाधिकारी असलेल्या अमृता कवठणकर (२६) यांना पाचारण करुन लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हसह ही बॅग ओळख त्यांच्याकडे सुपूर्द केली. हेल्पलाइनवर संपर्ककवठणकर या शनिवारी दिवा ते सीएसएमटी असा प्रवास करीत होत्या. सकाळी ११.०८ वाजता त्यांची उपनगरी रेल्वे सीएसएमटी स्थानकात पोहोचली. त्यावेळी लॅपटॉपची बॅग न घेताच त्या रेल्वेतून उतरल्या. त्यानंतर हीच रेल्वे टिटवाळ्याकडून ११.२४ ला तिथून सुटल्यानंतर त्यांनी ही माहिती हेल्पलाईनवर देऊन मदतीची मागणी केली. ही माहिती मिळताच ठाणे आरपीएफकडून सकारात्मक मदत मिळाल्याने त्यांनी सिंग यांच्यासह त्यांच्या पथकाचे आभार मानले.
रेल्वेमध्ये गहाळ झालेली लॅपटॉपची बॅग मिळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 1:39 AM