शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

बाळासाहेब ठाकरे कला दालनासाठी अवघ्या तीन दिवसांमध्ये मुंबई - ठाण्यातून जमा झाली १५० चित्रे

By जितेंद्र कालेकर | Published: February 06, 2020 10:19 PM

ठाण्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे तसेच कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या प्रदर्शनासाठी अवघ्या तीन दिवसांमध्ये ठाणे मुंबईतून तब्बल १५० चित्रे जमा करुन ती प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देठाण्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण व्यंगचित्रांनी लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तीन हात नाका येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे तसेच कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. लोकार्पणााच्या निमित्ताने याठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आधारित चित्रे, व्यंगचित्रे आणि शिल्पांचेही प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनासाठी अवघ्या तीन दिवसांमध्ये ठाणे मुंबईतून तब्बल १५० चित्रे जमा करुन ती प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार, मार्मिक आणि सामनाचे संपादक, शिवसेनेचे कुशल संघटक, बेडर समाजसुधारक असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांचा संपूर्ण इतिहास आणि जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती देशातील तरुणांसह भावी पिढीला कायमस्वरु पी उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे वैयक्तीक आणि प्रासंगिक फोटो, त्यांची गाजलेली भाषणे, पुस्तके आणि भाषणाच्या सीडीज आदींचा संग्रह याठिकाणी ठेवण्यात आला आहे. महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून हे स्मारक ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उभारले आहे. ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.* दोन मजल्यांच्या या स्मारकारमध्ये चित्रकला, मुद्रण आणि शिल्पकलेसाठी स्वतंत्र दालनांचा समावेश आहे. व्यंगचित्रकार, चित्रकार अशा कलाकारांना आपल्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी या ठिकाणी माफक दरामध्ये ठाणे महापालिकेने स्वतंत्र कलादालनाची सुविधा केली आहे. जे. जे. स्कूल आॅफ आर्टचे प्राध्यापक तसेच चित्रकार काशीनाथ साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील ‘स्वत्व’ संस्थेचे श्रीपाद भालेराव यांच्यासह १५० ते २०० चित्रकारांच्या समुहाने ३ ते ६ फेब्रुवारी २०२० या अवघ्या तीन दिवसांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १५० चित्रे मिळविली. यामध्ये चित्रकार प्रकाश बाळ जोशी, चंद्रकांत चेन्ने आणि विजयराज बोधनकर यांनी साकारलेल्या बाळासाहेबांच्या विविध चित्रांचा तसेच शिल्पकार महेश आंजर्लेकर यांच्या शिल्पांचाही यात समावेश आहे. याशिवाय, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी काढलेली बाळासाहेबांची १० व्यंगचित्रे आणि सहा आर्कचित्रेही या दालनात खास आकर्षण ठरली आहेत.* दस्तुदखुद्ध शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी जत्रा आणि मार्मिक या मासिकासाठी काढलेली दहा व्यंगचित्रेही स्मारकामध्ये ठेवण्यात आली आहेत.* २०१२ मध्ये ठाण्यात शिवसेनाप्रमुखांची शेवटची सभा झाली. या सभेत व्यासपीठावर बाळासाहेब ज्या खुर्चीत विराजमान झाले होते, ती खूर्ची या स्मारकामध्ये त्यांची आठवण म्हणून खास तळमजल्यावरील दालनात दर्शनी भागात जतन करण्यात आली आहे.* पहिल्या मजल्यावर ठाण्यातील स्थानिक ‘स्वत्व’ या संस्थेच्या ३० कलाकारांची १२० चित्रे असून ठाणे स्कूल आॅफ आर्ट आणि मुंबईतील रचना संसद स्कूल आॅफ आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट येथील शिक्षकांंच्याही चित्रांचा यामध्ये समावेश आहे. पुढील आठ दिवस हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले राहणार आहे.

 

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारण