ठाणे : गुरुपौर्णिमा म्हणजे निष्ठा आणि विश्वास असे सांगत शिवसेना खासदार राजन विचारे यानी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला. तर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे माझे गुरु असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हे नेहमी एकत्रित असतात आणि गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आनंद मठात साजरी करतात पण यंदाचे राजकीय समीकरण आणि एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला त्यानंतर राजन विचारे त्यांच्या सोबत जातील असं सांगितले जात होते पण तसं अजुन पर्यंत तरी दिसले नाही. तर आज गुरुपौर्णिमे निमित्त खासदार राजन विचारे यांनी एकट्यानेच आनंदमठात येवून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते शक्ति स्थळावर देखील गेले होते यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वाद आणि आनंद दिघे यांची शिकवण यामुळेच आज आमच्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक हा खासदारापर्यंत पोहोचू शकला असल्याचा त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्यामुळेच मागील 40 वर्षे मी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून काम करीत आहे मराठी लोकांसाठी हिंदुत्वासाठी काम करीत आहे तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे काम हा सर्वसामान्य शिवसैनिक करत आहे 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येयानेच आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून काम करीत आहोत. आनंदी के हे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना एके शिवसेना अशा पद्धतीने तळागाळातील लोकांसाठी तसेच ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्रासाठी काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी घे या दोघांनीही तळागाळापर्यंत शिवसेना नेली आणि शिवसेनेसाठी शेवटपर्यंत काम केले. परंतु यावेळी राजन विचारे यांनी इतर राजकीय भाष्य करण्यास नकार दिला.