शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

गणेशोत्सवात प्लास्टीकचा आणि थर्माकॉलचा वापर बंद; गणेशोत्सव काळात आतापर्यंत ५४ टन निर्माल्य संकलित

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 10, 2022 4:13 PM

समर्थ भारत व्‍यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विदयमाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करणे व त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्‍या वर्षात पदार्पण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सव काळात यावर्षी ५४ टन निर्माल्य संकलित झाले. पैकी ४७ टन निर्माल्य शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येणाऱ्या प्रक्रियेसाठी देण्यात आले. या दहा दिवसांच्या गणेशोत्सवात १० टक्के अविघटनशील घटक आढळून आले तर सजावटीमध्ये जवळपास प्लास्टीकचा वापर नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. यंदा फुले महाग असल्याने फुलांचा वापर कमी करण्यात आल्याने निर्माल्य देखील घटल्याची माहिती समर्थ भारत व्यासपीठाने दिली.

समर्थ भारत व्‍यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विदयमाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करणे व त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्‍या वर्षात पदार्पण केले. यंदा दिड दिवसाच्‍या गणपती विसर्जनात जवळपास १० टन तर पाचव्या दिवसांच्या गणपती विसर्जनात १२ टन तर गौरी गणपती विसर्जनावेळी १५ टन निर्माल्‍य तसेच, दहा दिवसांच्या गणेशोत्सवात १७ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. यंदा घरगुती गणेशोत्सवाबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही निर्माल्य संकलनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समर्थ भारत व्यासपीठाने सांगितले. शहरातील जवळपास ७ विसर्जन घाटावर दरवर्षी सफाई सेवक व कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातून गणेश भक्‍तांकडून निर्माल्‍य व सजावटीचे साहित्‍य संकलित केले जात होते. विसर्जन घाटावर तैनात करण्‍यात आलेल्‍या वाहनांमध्‍ये या निर्माल्‍याचे जैविक व अजैविक असे वर्गीकरण केले जाते.

वर्गिकृत कचरा समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या संयुक्‍त कचरा व्‍यवस्‍थापनावर पाठवला जातो. जैविक कचऱ्यातून खत निर्मिती केली जाते तर अजैविक कच-यात असलेल्‍या प्‍लास्‍टीक, कागद, पुठठा, काच, कागद सारखे घटक देखील संस्‍थेच्‍या प्रकल्‍प पुर्ननिर्माणमध्‍ये शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाटीसाठी पाठवले जातात. दिड दिवस, पाच दिवस, सहा आणि दहा दिवसांच्याच्‍या विसर्जनात जवळपास ५४ टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. कोविड नंतर यंदाचा गणेशोत्‍सव मोठया उत्‍साहात साजरा होत. शुक्रवारी दहा दिवसांच्या गणेशाचे विसर्जन झाले त्यात १७ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. संपूर्ण दहा दिवसांच्या गणेशोत्सवापर्यंत १० टक्के अविघटनशील घटक आढळून आले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सव