- सदानंद नाईक उल्हासनगर - कॅम्प नं-३, शास्त्रीनगरात राहणारी महिलांना तीच्या ९ वर्षाच्या मुलीला मारहाण करते. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना महिला बांगलादेशी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी महिलेला मुलीसह अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, येथील शास्त्रीनगर मध्ये एका खोलीत भाड्याने राहण्यासाठी आलेली महिला ही तीच्या ९ वर्षाची मुलीला मारहाण करीत असे. शेजारील नागरिकांनी मुलीला होत असलेल्या मारहाणीची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी शास्त्रीनगर गाठून मुलीला मारहाण करणाऱ्या महिलेला याबाबत जाब विचारून कारवाईचे संकेत दिले. पोलिसांनी महिलेचे नाव विचारले असता, महिलेने अमीना सुलतान उर्फ पूजा असल्याचे सांगून ती बंगलादेशात राहणारी असल्याचे सांगितले. दोन ते तीन महिन्यापासून शहरात येऊन धुनी-भांड्याची कामे करीत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी महिलेला मुलीसह अटक करून गुन्हा दाखल केला. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.
उल्हासनगरसह परिसरात राहणाऱ्या ३० पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना गेल्या चार महिन्यात अटक केली. यामध्ये महिलांची संख्या जात असून बहुतांश महिलांना धुनी-भांडीचे काम करीत असल्याचे उघड झाले. यामागे मोठी गँग सक्रिय असल्याचे बोलले जात असून बांगलादेशी नागरिकांना घरे भाड्याने देणाऱ्यावरही पोलिसांनी कारवाई सुरु केली. घर अथवा खोली भाड्याने देते वेळी, भाड्याने राहणारी महिला अथवा पुरुष कोणत्या राज्याचा व देशाचा आहे. याबाबत माहिती घेण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.