ठाणे : महामंडळांकडून येणाऱ्या कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवण्यासह महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हातील बँकांच्या आढावा बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे संबंधीतांनी केल्या.या आढावा बैठकीत शेतकऱ्यां च्या पीक कर्जासह शासनाच्या महत्त्वकांशी योजनांमध्ये बँकांचे असलेले योगदान आणि आतापर्यंत विविध योजनांवर झालेला कर्ज पुरवठा आदीं विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, माविम, शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळ आदींनी बँकांकडे प्रकरणे दीर्घ काळासाठी प्रलंबित राहतात अशा तक्रारी केल्या. महिला बचत गटांची खाती लवकर उघडण्यात येत नाहीत, यामुळे त्यांच्या कर्ज पुरवठ्यासह संभाव्य विकासावर ही परिणाम होतो असे माविम प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक व्ही. बी. सोने यांनी त्यांच्याकडील पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, खादी आणि ग्रामोद्योग यामधील उद्दिष्ट्यपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत . मात्र बँकांनी त्यांच्याकडे प्रकरणे गेल्यानंतर त्यावर तातडीने योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा प्रलंबित ठेवल्यास विपरीत परिणाम होतो असे सोने यांनी सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतही केवळ १९ टक्के कर्जवाटप आत्तापर्यंत झाले असून ते वाढविण्याची गरज आहे. बँकांनी यासाठी त्यासाठी तालुकानिहाय मेळावे घ्यावे अशी सुचना जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी केली.
ठाणे जिल्हातील महिला बचत गटांचे खाते उघडण्यास बँकांचा विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 6:41 PM
या आढावा बैठकीत शेतकऱ्यां च्या पीक कर्जासह शासनाच्या महत्त्वकांशी योजनांमध्ये बँकांचे असलेले योगदान आणि आतापर्यंत विविध योजनांवर झालेला कर्ज पुरवठा आदीं विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
ठळक मुद्दे महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंबप्रधानमंत्री मुद्रा योजनेतही केवळ १९ टक्के कर्जवाटप विकास महामंडळ आदींनी बँकांकडे प्रकरणे दीर्घ काळासाठी प्रलंबित