ठाणे : कोरोनाचे सावट कायम असतानाही ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी ही शहरे बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. एकीकडे गणेशभक्तांमध्ये उत्साह, तर दुसरीकडे प्रशासनाला कोरोना पसरण्याची चिंता, अशा वातावरणात यंदाचा गणेशोत्सव पार पडणार आहे.>चार हजार पोलिसांचा कडक बंदोबस्तकोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका निघणार नाही, याकडे पोलिसांची नजर असणार आहे. ३५ पोलीस ठाण्यांतील तीन हजार पोलिसांसह मुख्यालयातील एक हजार पोलीस उत्सवादरम्यान ठिकठिकाणी तैनात केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.>कुटुंबासोबत घरीच उत्सव साजरा करावालोकांनी हा सण घरीच साजरा करावा. मोठे समारंभ करू नयेत. सार्वजनिक मंडळांना हा सण साजरा करायचा असेल, तर तो प्रामुख्याने कोविडशी संबंधित किंवा इतर रुग्णांना मदत होईल, या अनुषंगाने साजरा करावा. गर्दी करू नये. घरच्याघरी हा उत्सव साजरा करावा.- राजेश नार्वेकर,जिल्हाधिकारी, ठाणे>विसर्जन स्थळेठाणे शहरात मासुंदा तलाव, खारेगाव, रेवाळे, पायलादेवी मंदिर, उपवन, नीलकंठ हाइट, रायलादेवी तलाव नं. १, तलाव नं. २, घोसाळे तलाव, खिडकाळी, कोलशेत विभाग, ब्रह्मांड, दातिवली, न्यू शिवाजीनगर येथील कृत्रिम तलावांवर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.>मूर्तींची स्थापनाठाणे शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक आणि घरगुती मिळून सुमारे एक लाख ८२ हजार ४१४ गणपतींचे आगमन होणार आहे. तर, २० हजार ७१० गौरींचे आगमनही होणार आहे. या गणोशमूर्ती ठाण्यातील विविध केंद्रांतून, पेण, कल्याण, डोंबिवली, खडवली, टिटवाळा, मीरा-भार्इंदर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर येथून येणार आहेत. प्रशासनाच्या आवाहनाला दाद देत सजग ठाणेकरांनी यावेळी घरीच विसर्जन करता येईल, अशा मातीच्या मूर्तींना पसंती दिली आहे.महापालिका,विविध मंडळे,गृहनिर्माण संस्था,लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.न्यायालयाचे आदेश, महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत व मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत.श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता चार फूट आणि घरगुती गणपतीसाठी दोन फुटांची असावी.शक्यतो पारंपरिक मूर्र्तींऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्र्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. ते शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.उत्सवाकरिता देणगी-वर्गणी स्वेच्छेने दिल्यास तिचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पाहावे. आरोग्यविषयक, सामाजिक जाहिराती प्रदर्षित करण्यास पसंती देण्यात यावी.सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषय उपक्रम उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार व त्याचे प्रतिबंधक उपाय त्याचप्रमाणे स्वचछता याबाबत जनजागृती करण्यात यावी.आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा आॅनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे, तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जातील, याकडे लक्ष द्यावे.श्रींची आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीतकमी वेळ थांबावे. (राज्य शासनाच्या सूचना)
कोरोनाच्या संकटात बाप्पानं यावे विघ्न घालवावे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:01 AM