शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

अंगारकीला चला बाप्पाच्या भेटीला; एसटीच्या ठाणे विभागाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 2:46 AM

टिटवाळा अन् पालीला विशेष फेऱ्या

- पंकज रोडेकर

ठाणे : यंदापासून अंगारकीनिमित्त ‘चला बाप्पाच्या भेटीला’ या अनोख्या उपक्रमांतर्गत प्रत्येक ठाणे एसटी विभागातील प्रत्येक डेपोतून साधारणत: दोन बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला ठाणे जिल्ह्यातील ‘टिटवाळा’ आणि रायगड जिल्ह्यातील ‘पाली’ या ठिकाणी त्या सोडण्याचे नियोजन आहे. तसेच अन्य गणपती तीर्थस्थळी जायची अशी मागणी पुढे आल्यास त्या ठिकाणीही बस सोडण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.प्रवासी संख्या वाढवण्यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पुणे परिवहन विभागाने सुरू केलेल्या ‘अष्टविनायक सहली’च्या धर्तीवर हा उपक्रम यंदापासून प्रादेशिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय ठाणे परिवहन विभागाने घेतला आहे. त्यानुसार ठाणे परिवहन विभागातंर्गत ठाणे १ आणि २, कल्याण, भिवंडी, वाडा, मुरबाड, शहापूर आणि विठ्ठलवाडी अशा आठ डेपोतून यंदापासून साधारणत: २० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. अंगारकीला बाप्पाच्या दर्शनासाठी जाणाºयांसाठी आॅनलाइन बुकिंगची व्यवस्था केली आहे. तसेच बसमध्ये वाहकाद्वारेही तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा पहिला प्रयत्न असून नागरिकांनी अन्य गणपती तीर्थक्षेत्र असलेल्या स्थळी जायचे असल्यास व तशी मागणी केल्यास बस सोडण्यात येणार आहेत.अंगारकीला वेगवेगळ्या ठिकाणी बाप्पाचे तीर्थक्षेत्र असलेल्या स्थळी जाणाºया भाविकांची संख्या जास्त आहे. ती लक्षात घेऊन यंदापासून अंगारकीला बस सोडण्याबाबत प्रत्येक डेपो व्यवस्थापकांना सांगितले. तसेच ठाण्यात पहिल्यांदा असा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. वर्षातून येणाºया अंगारकीला बस सोडल्या जाणार आहेत. जर नागरिकांनी टिटवाळा-पाली या व्यतिरिक्त अन्य तीर्थक्षेत्रस्थळी जाण्याची मागणी केल्यास त्याप्रमाणे बसचे नियोजन करण्यात येईल. या उपक्रमाद्वारे सुरू केलेल्या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा.- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे परिवहन विभाग

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाganpatiगणपती